Maharashtra State Employee : राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अन कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा निर्णय झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल दहा हजाराची वाढ राज्य शासनाच्या माध्यमातून झाली आहे.
खरं पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून या शिक्षण सेवकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली जावी अशी मागणी केली जात होती. औरंगाबाद खंडपीठाने देखील कर्मचाऱ्यांना दिल जाणार मानधन अतिशय कमी असून यामध्ये त्वरित वाढ करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
निर्णय हिवाळी अधिवेशनात झाला असला तरीदेखील याचा जीआर म्हणजेच शासन निर्णय हा आता जारी झाला आहे. दरम्यान आज आपण या शासन निर्णयात नेमक काय आहे. शिक्षण सेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ झाली आहे हे जाणून घेणार आहोत. अशा परिस्थितीत या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.