Maharashtra State Employee Latest News : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता राज्य शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमच पदोन्नतीबाबत निराशा हाती लागते. वेळेत पदोन्नती न मिळणे याचा जवळपास राज्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचा सामना करावा लागतो.
दरम्यान आता राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. जवळपास गेल्या वर्षभरापासून रखडलेली पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती अखेर कार मार्गी लागणार आहे. राज्यातील जवळपास 520 पोलीस कर्मचाऱ्यांना आता पदोन्नती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आवश्यक ती कारवाई केली जात आहे.
हे पण वाचा :- जुनी पेन्शन योजना : OPS ला नक्षलवाद्यांचे समर्थन; ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा जुनी पेन्शन मुद्दा चर्चेत
हाती माहितीनुसार पोलीस महासंचालक कार्यालयाने या अनुषंगाने संवर्ग बंधपत्र संबंधित हवालदारांकडून मागितल आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 2013 मध्ये पीएसआय या पदासाठी डिपार्टमेंटल एक्झाम पार पडली. यानुसार तब्बल 520 पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक अर्थातच पीएसआय पदासाठी बढती दिली जाणार होती.
यासाठी ची यादी जाहीर झाली होती. मात्र, तांत्रिक अडथळ्यांमुळे संबंधित पात्र हवालदारांची बढती रखडली. यामुळे संबंधित पात्र हवालदारांकडून लवकरात लवकर पदोन्नती देण्याची मागणी देखील जोर धरत होती. आता मात्र लवकरच या पात्र हवालदारांना पीएसआय पदी बढती दिली जाणार आहे.
हे पण वाचा :- महावितरणची शेतकऱ्यांसाठी मोठी ऑफर! ‘इतकं’ वीजबिल भरा आणि थकबाकी मुक्त व्हा, आधी सविस्तर माहिती वाचा
आता पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी पदोन्नती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. पदोन्नतीसाठी पात्र 387 पोलीस हवालदारांना नुकताच संवर्ग आणि बंधपत्र मागण्यात आली असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हाती आली आहे.
निश्चितच या संबंधित पात्र हवालदारांना यामुळे दिलासा मिळणार असून पोलीस प्रशासनातील या अनुभवी लोकांचा निश्चितच प्रशासनाला आणि शासनाला फायदा होणार आहे. दरम्यान उशिरा का होईना मात्र पदोन्नती मिळाली असल्याने या संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- उन्हाळ्यात वीज बिल अधिक येत ना ! मग घराच्या छतावर बसवा सोलर पॅनल; सरकार अनुदानही देणार, ‘या’ अँप्लिकेशनवर करा अर्ज