Maharashtra State Employee : महाराष्ट्रातील जवळपास 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक, केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी गुड न्यूज दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात शासनाकडून वाढ करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ झाली असून आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आला आहे. जरी महागाई भत्ता जानेवारी महिना पासून अनुज्ञय केला असला तरीदेखील याचा प्रत्यक्ष लाभ मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- खुशखबर ! मुंबईहुन सुटणाऱ्या ‘या’ सुपरफास्ट ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार; पहा…
यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील मिळाली आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या निर्णयानंतर लगेचच राजस्थान सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला. यामुळे केंद्र शासनाच्या निर्णयानंतर लगेचच घेतलेल्या या निर्णयाचे राजस्थानमधील राज्य कर्मचाऱ्यांनी स्वागत केले तसेच अशी जलद अंमलबजावणी महाराष्ट्रात देखील झाली पाहिजे अशी आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांनी मागणी केली.
नुकत्याच महाराष्ट्र राज्य शासनाच्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत देखील कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्य कर्मचारी पुन्हा जाणार संपावर; ‘या’ मुख्य मागणीसाठी कर्मचारी पुन्हा उपसणार संपाच हत्यार, पहा….
या मागणीवर शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्ता वाढीसाठीचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याचे चित्र आहे.
आता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांना या महागाईच्या काळात दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर ! ‘या’ सरकारी बँकेत निघाली मोठी भरती; आजच करा इथं अर्ज, पहा…