स्पेशल

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नादच खुळा! चक्क पांढऱ्या जांभळाची केली लागवड, एका एकरात झाली 4 लाखांची कमाई, पहा ही यशोगाथा

Maharashtra Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी, गारपीट अतिवृष्टी यांसारख्या संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. शिवाय उत्पादित केलेल्या शेतमालाला अनेकदा बाजारात चांगला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होते. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मनसुबे मोठे ताकदवर आहेत.

हेच कारण आहे की, या विपरीत परिस्थितीचा सामना करतही राज्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे हे नवीन प्रयोग आपल्या जिद्दीच्या आणि सुयोग्य नियोजनाच्या बळावर यशस्वी देखील करतात. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सबंध देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन पायंडा सेट केला आहे.

हे पण वाचा :- मराठवाड्यातील नागरिकांचा मुंबईकडील प्रवास होणार सुसाट; ‘हा’ नवीन मार्ग होणार तयार, शिरूरमधील वाहतुकीला पण होणार फायदा, पहा संपूर्ण रूटमॅप

दरम्यान जालना जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने असंच काहीस काम शेतीमध्ये केल आहे. जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क पांढऱ्या जांभळाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. याची शेती केवळ यशस्वी करून दाखवली असं नव्हे तर एकरी चार लाखापर्यंतचे उत्पन्न कमवत इतरांसाठी मार्गदर्शक असं काम देखील केल आहे.

जालना जिल्ह्यातील मौजे सिंधी काळेगाव येथील प्रयोगशील शेतकरी एकनाथरावजी मुळे यांनी हा भीम पराक्रम केला आहे. मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे वडीलोपार्जित 25 एकर जमीन आहे. यामध्ये ते कायमच नवनवीन प्रयोग करतात. कायमच वेगवेगळ्या पिकांची लागवड त्यांच्या माध्यमातून केली जाते. दरम्यान त्यांनी इंटरनेटवरून पांढऱ्या जांभळ्याची शेती कशी करायची याबाबत माहिती जमवली.

हे पण वाचा :- पंजाब डख : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; मे अन जून महिन्यात कसं राहणार हवामान? वाचा डख यांचा सविस्तर हवामान अंदाज

पांढऱ्या जांभूळची शेती कशी होते याबाबत योग्य माहिती मिळवल्यानंतर त्यांनी पश्चिम बंगाल राज्यातून याची रोपे मागवली. त्यांनी दोनशे रोपे तीनशे रुपये प्रति नग याप्रमाणे पश्चिम बंगाल मधून मागवली आणि 2019 मध्ये आपल्या एक एकर शेत जमिनीवर याची लागवड केली. बारा बाय दहा फूट अंतरावर त्यांनी या रोपांची लागवड केली.

लागवड केल्यानंतर सुयोग्य नियोजन आखले. पांढऱ्या जांभळाच्या पिकासाठी त्यांनी रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्ण सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून आता तीन वर्षानंतर जांभूळ बागेतून त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात होणार आहे.

हे पं वाचा :- पुणे-नासिक हायस्पीड रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची परवानगी केव्हा मिळणार, प्रकल्पाची सद्यस्थिती काय? पहा….

मुळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक झाडावर 14 ते 15 किलो जांभूळ तयार झाले आहेत. येत्या सात-आठ दिवसात या जांभळाची हार्वेस्टिंग आता केली जाणार आहे. सध्या बाजारात या पांढऱ्या जांभळाला दोनशे रुपये प्रति किलो पासून ते 400 रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळत आहे.

अशा परिस्थितीत सर्व काही नियोजनाप्रमाणे घडले तर त्यांना एकरी तीन ते चार लाख रुपयांपर्यंतची कमाई यावर्षी होणार आहे. निश्चितच काळाच्या ओघात शेतीमध्ये केलेला हा बदल मुळे यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून यामुळे इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील शेतीत काहीतरी जरा हटके आणि नवीन करण्याची प्रेरणा मिळणार एवढं मात्र नक्की.

हे पण वाचा :- मुंबई महापालिकेत नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल एक लाख रुपये महिना

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts