Maharashtra Viral News : महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घट मांडणी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. विशेष बाब म्हणजे केळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातील लोकांमध्ये देखील या घट मांडणी संदर्भात मोठी आस्था, श्रद्धा आहे. यामुळे दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यासमवेतच संपूर्ण राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि शेतमजूर वर्ग या भेंडवळच्या घट मांडणीमध्ये मांडल्या जाणाऱ्या भविष्यवाणीकडे लक्ष ठेऊन असतात.
दरम्यान यंदाची म्हणजेच वर्ष 2023 ची भेंडवळ येथील घट मांडणीमधील भविष्यवाणी नुकतीच जाहीर करण्यात आली असे. यामध्ये यंदाच्या मान्सून बाबत म्हणजेच पावसाळ्याबाबत एक मोठी माहिती देखील समोर आली आहे.
आज 23 एप्रिल 2023 वार रविवार सकाळी सहा वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे.आम्ही आपणास सांगू इच्छितो की सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी घट मांडणीच्यास्थळी पाहायला मिळाली. यामुळे नेहमीप्रमाणेच यंदा देखील या भेंडवळच्या भविष्यवाणीच्या सर्वत्र चर्चा आहेत.
या भविष्यवाणींमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी समाधानाचं राहणार आहे. या भेंडवळच्या भविष्यवाणीत असं सांगितलं गेलं आहे की, यावर्षी म्हणजेच जून 2023 मध्ये मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये देखील सर्वसाधारण पाऊस पडेल मात्र ऑगस्ट महिन्यात प्रचंड पावसाची शक्यता राहणार आहे.
हे पण वाचा :- सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा
यावर्षी देखील शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचा सामना करावा लागू शकतो असे या भविष्यवाणीत नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त राजकारण स्थिर असेल असं सांगितलं जात आहे. मात्र घट मांडणीमध्ये पहिल्यांदाच विंचू निघाल्याने यावर्षी रोगराईची परिस्थिती महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राहू शकते असा अंदाज आहे.
एकंदरीत शेतकऱ्यांसाठी यंदाच वर्ष समाधानाचं असलं तरी देखील अतिवृष्टीमुळे काही भागातील शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त याहीवर्षी रोगराई सारखी परिस्थिती महाराष्ट्रात तसेच देशात तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितच नागरिकांना आरोग्यबाबत विशेष सतर्क रहावे लागणार आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांची शिंदे फडणवीस सरकारच्या काळात 960 कोटी रुपयांची देणी थकली; वाचा सविस्तर