Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. अशातच राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने कमाल तापमानात कमालीची घसरण झाली आहे.
आगामी तीन-चार दिवसात कमाल तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस पर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे सहाजिकच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. तसेच देशातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस देखील पडणार आहे.
भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून अर्थात 24 मे 2023 पासून देशातील काही भागात वळवाचा पाऊस पडणार आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हे पण वाचा :- बँकेत जॉब शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकेत निघाली लिपिक पदाची मोठी भरती, पदवीधर तरुण राहणार पात्र, आजच करा अर्ज
IMD नें दिलेल्या आद्ययावत माहितीनुसार, भारताताच्या उत्तरेकडील राज्यात हवामानात होत असलेल्या बदलामुळे वळवाचा पाऊस पाहायला मिळणार आहे.
यात हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बलुचिस्तान, मुझफ्फरबाद, उत्तराखंड, पंजाब आणि दक्षिण हरियाणा या राज्यांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून या संबंधित राज्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे या संबंधित राज्यात 26 मे पर्यंत मुसळधार पाऊस तर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे या संबंधित राज्यातील नागरिकांना विशेष सतर्क रहावे लागणार आहे. तसेच हवामान विभागाने राज्यात देखील मान्सूनपूर्व पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हे पण वाचा :- आता मतदान कार्ड काढण्यासाठी कुठं जाण्याची गरजच नाही; केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, अमित शहा यांनी दिली माहिती, वाचा….
महाराष्ट्रात कुठे पडणार मान्सूनपूर्व पाऊस
राज्यात प्रामुख्याने विदर्भात मानसून पूर्व पावसाची शक्यता राहणार असून विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला आहे. यामुळे विदर्भातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भसहित मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. पंढरपूर, अकोला, नासिकसह राज्यातील अनेक भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे तेथील वातावरणात गारवा तयार झाला आहे.
दरम्यान मान्सून पूर्व पाऊस कोसळत असल्याने आता शेतकऱ्यांना मान्सूनची चाहूल लागली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने लवकरच मान्सूनचे केरळात आगमन होणार असल्याचा मोठा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतीकामांना आता वेग आला आहे.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या चहावाल्याचा पोरगा बनला अधिकारी ! यूपीएससी परीक्षेत संगमनेरचा मंगेश चमकला, विपरीत परिस्थितीत मिळवल यश, वाचा….