Mahavikas Aaghadi Jahirnama : महाराष्ट्रातील यंदाची विधानसभा निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस असे एकूण सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अर्थातच दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे यंदाची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत असून दोन्ही गटांकडून अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठमोठ्या घोषणा आपल्या जाहीरनाम्यात केल्या आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि आता महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज अखेर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात अनेक मोठमोठ्या घोषणा झाल्या असून आज आपण आघाडीने जाहीर केलेला हाच संपूर्ण जाहीरनामा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा
महिलांना बसचा प्रवास मोफत
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देणार
जातीआधारित जनगणना करणार
महिलांना प्रत्येक वर्षाला 6 गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांना देणार
महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करू
300 यूनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरांना 100 यूनिटपर्यंत मोफत वीज
प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेऊ.
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविणार
शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार
न्यू इंडिस्ट्रियल पॉलीसी तयार करू, यातून रोजगारनिर्मिती, कामगारांचे कल्याण करू
2.5 लाख रिक्त जागा भरण्यासाठी एमपीएससी परीक्षा प्रक्रिया चालू करू
चैत्यभूमी, दादर, इंदूमील येथे स्मारक बांधण्याची तत्काळ सुरूवात करण्यात येईल
एमपीएससीचा 45 दिवसात रिझल्ट लावणार