स्पेशल

दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महावितरण मध्ये ‘या’ पदासाठी मोठी भरती, अर्ज कसा करणार, वाचा

Mahavitaran Recruitment : दहावी पास तरुणांसाठी एक मध्ये आनंदाची बातमी समोर येत आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात असतील अशांसाठीही ही आनंद वार्ता खास राहणार आहे. कारण की, महावितरण मध्ये विविध पदाचा रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अर्थातच महावितरणमध्ये लाईनमन आणि कॉम्प्युटर ऑपरेटर याच्या अप्रेंटिस साठी रिक्त जागा निघाल्या आहेत. दरम्यान आज आपण या पदभरतीसंदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

हे पण वाचा :- शेअर आहे का कुबेरचा खजाना ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिला 3,050 टक्क्याचा परतावा, 1 लाखाचे बनलेत किती?, पहा….

कोणत्या आणि किती जागांसाठी निघाली भरती

लाईनमन आणि कम्प्युटर ऑपरेटरच्या अप्रेंटिससाठी ही भरती आहे. या पदाचा एकूण 320 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असणे जरुरीचे असून सोबतच उमेदवाराने संबंधित ट्रेड मधील आयटीआय कम्प्लीट केलेला असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

यासाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी सूट राहणार आहे.

नोकरी कुठे करावी लागणार

उमेदवारांना अहमदनगर येथे नोकरी करावी लागणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांची बल्ले बल्ले! 8 दिवस अगोदरच मान्सूनच आगमन; ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार Monsoon, पंजाब डख यांचा अंदाज

अर्ज कसा सादर करायचा

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार https://www.mahadiscom.in/ या लिंकवर जाऊन महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

16 मे 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

कागदपत्रे या पत्त्यावर पाठवा 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपले कागदपत्र आणि अर्ज अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., मंडळ कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

जाहिरात कुठे पाहणार?

https://drive.google.com/file/d/1XkJjp5ua0Yv_TFBYDaiFcMh61rFNCT_7/view या लिंक वर जाऊन उमेदवारांना या पदभरतीची सविस्तर जाहिरात पीडीएफ स्वरूपात पहावयास मिळणार आहे. 

हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट, तर ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts