Mahindra New Car Launch : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले आहे. अनेक नामांकित ऑटो कंपन्यांच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला पसंती दिली जात आहे. सध्या स्थितीला भारतीय कार मार्केटमध्ये टाटा कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला आहे.
कारण असे की टाटा कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये सध्या स्थितीला सर्वाधिक इलेक्ट्रिक कार पाहायला मिळतात. इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये बहुतांशी शेअर हा टाटा कंपनीचाच आहे. पण आता टाटा कंपनीच्या या वर्चस्वाला सुरंग लावण्यासाठी देशातील इतरही भारतीय कंपन्या जोरदार तयारी करत आहेत.
महिंद्रा कंपनीने देखील आपला इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करण्यास सुरुवात केली आहे. एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवणारी महिंद्रा आणि महिंद्रा आता इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आपले मजबूत अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी विशेष मेहनत घेत असल्याचे दिसते.
महिंद्राने आज 26 जानेवारी 2024 ला आपल्या 2 नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. त्याच्या इलेक्ट्रिक कार आणि बॉर्न इलेक्ट्रिक SUV च्या पोर्टफोलिओमध्ये ही एक नवीन भर आहे, याचा अर्थ या कार्स संकल्पनेच्या पातळीवरूनच इलेक्ट्रिक कार म्हणून विकसित केल्या गेल्या आहेत.
या गाड्यांमुळे महिंद्रा कंपनीचा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला आहे. दरम्यान आज आपण या दोन्ही गाड्यांच्या फीचर्स बाबत, स्पेसिफिकेशन्स बाबत आणि त्यांच्या किमती बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Mahindra ने XEV 9e आणि BE 6e कार लॉन्च केल्या आहेत.
महिंद्राच्या नवीन गाड्यांचे फिचर्स
Mahindra & Mahindra ने लॉन्च केलेल्या दोन्ही इलेक्ट्रिक कार त्यांची रचना बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय ठेवण्यात आली आहे. या गाड्यांचे डिझाईन विशेष आकर्षक आहे. BE 6e या गाडीत 59 kWh बॅटरी पॅक आणि XEV 9e गाडीत 79 kWh बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही कार एका चार्जमध्ये 400 ते 500 किमीची रेंज देणार असा दावा करण्यात आला आहे.
ही गाडी 20 टक्क्यांपासून ते 80 टक्क्यांपर्यंत फक्त 20 मिनिटांत चार्जिंग होणार असे बोलले जात आहे. महिंद्राच्या या गाड्या INGLO प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आल्या आहेत. हे प्लॅटफॉर्म अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते, असं कंपनीचे म्हणणे आहे. XEV 9e ची लांबी 4.789 मीटर असेल. तर त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 207 मिमी असेल.
यात 663 लीटरची बूट स्पेस आणि 150 लीटरची फ्रंक उपलब्ध आहे. तर BE 6e ची लांबी 4.371 मीटर असेल. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स देखील 207 मिमी असेल. यात 455 लिटरची बूट स्पेस आणि 45 लिटरची ट्रंक स्पेस असेल. कंपनीने या कारच्या विंडशील्ड, छतावरील काच आणि साइड ग्लासवर यूव्ही संरक्षण कोटिंग लावले आहे.
यामुळे, ही कार यूव्ही किरणांपासून 99.5 टक्के संरक्षण देते. यामुळे कार केबिन लवकर थंड होण्यास मदत होते. कंपनीचे म्हणणे आहे की या वैशिष्ट्यामुळे कारचे केबिन सामान्य कारच्या तुलनेत 40 टक्के वेगाने थंड होते. कंपनीने XEV 9e मध्ये एकूण 43 इंच स्क्रीन दिली आहे.
यामध्ये डाव्या बाजूचा स्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन म्हणून काम करेल. तर मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना स्वतःचे स्क्रीन बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात थिएटर मोड आहे, जो सर्व स्क्रीन एकत्र समक्रमित करेल आणि नंतर मध्यवर्ती स्क्रीन प्राथमिक युनिट म्हणून काम करेल.
किंमत किती आहे?
कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, Mahindra XEV 9e ची किंमत 21.90 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. तर BE 6e ची किंमत 18.90 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. सध्या या कारच्या पॅक-1 च्या किमती आहेत. बेकर पॅकच्या किमती नंतर लाँच केल्या जातील. चार्जर आणि इन्स्टॉलेशनचा खर्च यात समाविष्ट नाही. कंपनी चार्जरचे दोन पर्याय देईल.
देशभरातील महिंद्राच्या शोरूममध्ये या गाड्यांची बुकिंग सुरू होणार आहे. जानेवारी 2025 पर्यंत हे मॉडेल बाजारात पोहोचतील, तर कंपनी फेब्रुवारी 2025 पासून त्यांची डिलिव्हरी सुरू करणार आहे. कंपनी कारच्या बॅटरीवर आजीवन वॉरंटी देणार हे विशेष.