स्पेशल

लहान शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे ठरेल महिंद्राचे ‘हे’ मिनी ट्रॅक्टर! कमीत कमी खर्चामध्ये करेल शेतीची अवजड कामे, वाचा माहिती

सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले असून अगदी शेतीची पूर्व मशागत असो की आंतरमशागत तसेच पिकांच्या काढणीपर्यंतची अनेक कामे आता यंत्राच्या साह्याने करणे शक्य झाले आहे. तसेच देशातील कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून अनेक आधुनिक अशी यंत्र विकसित करण्यात आलेली आहेत.

शेतीमधील यंत्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर सगळ्यात जास्त कुठले यंत्र वापरले जात असेल तर ते म्हणजे ट्रॅक्टर हे होय. आपल्याला माहिती आहे की  शेतीमधील अनेक अवजारे हे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टरचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

भारतामध्ये अनेक कंपन्यांनी ट्रॅक्टरचे उत्पादन केले असून यामध्ये अनेक मिनी ट्रॅक्टर देखील आता शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होऊ लागले आहेत. अशा मिनी ट्रॅक्टरचा फायदा भारतातील लहान शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होतो तसेच फळबागायतदारांसाठी देखील मिनी ट्रॅक्टर खूप फायद्याचे ठरतात.

अशाच प्रकारे जर तुम्हाला देखील एखादे मिनि ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे महिंद्रा ओजा 2121 भारतीय शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.

 महिंद्रा ओजा 2121 हे आहे महिंद्राचे लोकप्रिय मिनी ट्रॅक्टर

महिंद्रा ट्रॅक्टरचे महिंद्रा ओजा 2121 हे मिनि ट्रॅक्टर भारतीय शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय असून महिंद्रा कंपनीच्या ओजा सिरीज मधील हे एक प्रगत तंत्रज्ञान युक्त असे ट्रॅक्टर आहे. अवघड कामे देखील हे ट्रॅक्टर सहजतेने पूर्ण करण्यास सक्षम आहे.समजा तुमच्याकडे कमी शेती आहे किंवा तुम्ही फळबाग लावलेला आहे

आणि त्या फळबागातील कामांसाठी तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे तर महिंद्रा ओजा 2121 ट्रॅक्टर एक चांगला पर्याय ठरू शकते. कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये 2400 आरपीएम सह 21 एचपी जनरेट करणारे शक्तिशाली इंजिन दिले आहे. महिंद्राच्या ट्रॅक्टरमध्ये तीन सिलेंडर सह शक्तिशाली 3Di इंजिन दिले असून जे ७६ एनएम टॉर्कसह 21 हॉर्स पावर जनरेट करते. या ट्रॅक्टरला ड्राय टाइप एअर फिल्टर देण्यात आले असून जे धुळीपासून इंजिन सुरक्षित ठेवते.

या ट्रॅक्टरमध्ये 18 एचपीच्या जास्तीत जास्त पीटीओ पावर देण्यात आली असून जे शेती कामासाठी वापरण्यात येणारी  उपकरणे सहजपणे ऑपरेट करण्यासाठी सक्षम आहे. महिंद्रा ओजा 2121 ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 950 किलो इतकी ठेवण्यात आली असून त्यामुळे शेतकरी एकाच वेळी अधिक मालाची वाहतूक करू शकणार आहेत.

तसेच हे ट्रॅक्टर डेप्थ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक ड्राफ्ट प्रकारातील हायड्रोलिक प्रणाली सहित येते. महिंद्राचे हे मिनी ट्रॅक्टर मजबूत व्हीलबेसवर बांधले गेले असून त्याचा ग्राउंड क्लिअरन्स 303 एमएम आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये टेलिस्कोपिक आणि टिल्ट पावर स्टेरिंग असल्यामुळे शेतात आणि खराब रस्त्यावर देखील आरामात ते ड्राईव्ह करता येते.

हा मिनी ट्रॅक्टर 12 फॉरवर्ड + बारा रिव्हर्स गियर सह गिअरबॉक्स येतो. तसेच यामध्ये ऑइल एमर्स ब्रेक देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे ब्रेक अगदी निसरड्या जागेवर देखील टायर्सवर चांगली पकड ठेवण्यासाठी सक्षम आहेत. या ट्रॅक्टर मध्ये 5×12 फ्रंट टायर आणि 8×18 मागील टायर आहेत व ते आकाराने खूप मोठे असून चांगले ट्रॅक्शन आणि स्थिरता प्रदान करतात.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत आणि वारंटी?

महिंद्रा ओजा 2121 मिनी ट्रॅक्टरची भारतात एक्स शोरूम किंमत 4 लाख 97 हजार ते पाच लाख 37 हजार रुपये आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. तसेच कंपनीच्या माध्यमातून या मिनी ट्रॅक्टरला सहा वर्षाची वारंटी देण्यात आलेली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts