Mansoon News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून नैऋत्य मोसमी पावसाने रजा घेतली आहे. शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांनी पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणतं मान्सूनला आपला अखेरचा निरोप दिला आहे. दुसरीकडे मान्सून महाराष्ट्रातून माघारी फिरल्यानंतरही राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. खरे तर नैऋत्य मोसमी पाऊस परतल्यानंतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी पावसाकडे होत असतो.
यानुसार दक्षिणेकडील तामिळनाडू सहित आजूबाजूच्या राज्यांमध्ये ईशान्य मौसमी पाऊस सक्रिय झाला असून त्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील सध्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे मत हवामान खात्यातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्यात आणखी चार दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती आहे. दरम्यान आता आपण या कालावधीत राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार?
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीय वाऱ्यांमुळे आणि उष्णतेमुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील चार दिवस महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
आय एम डी नुसार आज अर्थातच १८ ऑक्टोबर रोजी कोकण, खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन विदर्भ या भागात पावसाची शक्यता आहे. राज्यातील पालघर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, नागपूर आणि भंडारा हे 9 जिल्हे वगळता उर्वरित 27 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
या अनुषंगाने या संबंधित 27 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उद्या १९ ऑक्टोबर आणि २० ऑक्टोबर रोजी विदर्भातील काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २१ ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. 21 तारखेला केवळ मध्य महाराष्ट्राच्या मध्य बिंदूच्या आसपासच्या जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
एकंदरीत राज्यात 21 तारखेपर्यंत पावसासाठी पोषक परिस्थिती आहे. 21 तारखेनंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार आहे. 21 नंतर पाऊस उघडीप देईल असे बोलले जात आहे.
सध्याचा पाऊस हा खरीप हंगामातील काढणी योग्य पिकांसाठी, कांदा तसेच फळबाग पिकांसाठी घातक ठरतोय. मात्र या पावसाचा आगामी रब्बी हंगामासाठी फायदा होणार आहे. रब्बी हंगामातील गहू हरभरा समवेत सर्वच पिकांना या पावसाचा फायदा होईल अशी आशा आहे.