स्पेशल

अनेकांनी सोडली शरद पवारांची साथ ! पण पन्नास वर्षांपासून हा व्यक्ती आहे आहे सावली सारखा उभा,वाचा कोण गामा ?

   मागच्या वर्षी शिवसेनेत बंडाळी झाली आणि तोच कित्ता काही दिवसा अगोदर राष्ट्रवादी पक्षात घडला. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतून एक गट बाहेर पडला व शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. राष्ट्रवादीचे या फुटलेल्या गटामध्ये प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यासारखे शरद पवारांच्या अगदी निकटवर्तीय समजले जाणाऱ्या नेत्यांचा देखील समावेश आहे. इतके शरद पवारांचे जवळचे समजले जाणाऱ्या सहकाऱ्यांनी देखील त्यांची साथ सोडली.

परंतु यामध्ये पवारांचा एक निष्ठावंत अजून देखील त्यांच्या सोबतीला असून हा गेल्या पन्नास वर्षांपासून शरद पवारांची प्रमाणिकपणे सेवा करत आहे. तो प्रामाणिक सोबती म्हणजे शरद पवार यांच्या गाडीचा चालक गामा हा होय. नेमका हा गामा कोण आहे? शरद पवारांना गामाची साथ किती महत्त्वाचे आहे? त्याबद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.

गामा आहे शरद पवारांचा प्रामाणिक साथी

या बद्दलचे सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी पक्षात फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वात प्रफुल्ल पटेल तसेच दिलीप वळसे पाटील व छगन भुजबळ यांच्यासारखे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे चेहरे त्यांना सोडून गेले. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांची प्रामाणिकपणे सेवा करणारा एक व्यक्ती त्यांच्यासोबत असून  त्याचे नाव गामा असे आहे व तो पवारांच्या गाडीचा चालक आहे. शरद पवारांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले व या शरद पवारांच्या आत्मकथा असलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये 2015 ते 2023 या कालावधी दरम्यान ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

या पुस्तक प्रकाशनाच्या अगदी दोन महिन्यांनी राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. या पुस्तकामध्ये शरद पवार यांनी त्यांच्या जीवनातील संबंधित अनेक घडामोडींवर भाष्य केलेले आहे. त्यामध्ये एकाठिकाणी शरद पवार यांनी देशातील उद्योगपती राहुल बजाज तसेच देशातील इतर नेते व यांच्यासोबत एक सर्वसामान्य व्यक्ती विषयी लिहिले आहे. हा व्यक्ती म्हणजे त्यांचा गाडीचा चालक गामा होय. गामाचे शरद पवारांसोबत असलेले त्यांच्या सेवेची 50 वर्षे आता पूर्ण झाली असून जवळच्या अनेक नेत्यांनी पवारांचे साथ सोडली परंतु हा व्यक्ती अजून देखील पवारांसोबतच आहे.

फुटी नंतर शरद पवार यांनी पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी घेतली. त्यावेळी देखील त्यांच्या वाहनांचे चालक गामा हेच होते. शरद पवारांचे वय झाले असले तरी त्यांचा प्रवास आज देखील प्रचंड प्रमाणात असल्यामुळे प्रवासामध्ये गामा त्यांचा वाहन चालक नसून त्यांच्या काळजी घेणारा एक महत्त्वाचा व्यक्ती देखील आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून या पूर्ण दौऱ्यात गामा हा त्यांच्यासोबत आहे.

 गामा हे शरद पवारांच्या सेवेत कसे आले?

बारामती या ठिकाणचे दिवंगत डॉक्टर एम.आर. शहा यांच्या गाडीचा ड्रायव्हर गामा होता. त्यांनीच हा त्यांचा ड्रायव्हर शरद पवारांकडे पन्नास वर्षांपूर्वी दिला. तेव्हापासून ते आतापर्यंत पवारांच्या वाहनाचे सारथ्य गामा करत आहे. वाहन चालवणे एवढेच नाही तर पवारांची प्रवासातील सारी व्यवस्था गामा यांच्याकडे असते.’लोक माझे सांगाती’ या पवारांच्या आत्मकथेत त्यांनी गामा यांच्या बद्दल थोडक्यात उल्लेख केलेला आहे.

ते म्हणतात की, महाराष्ट्राच्या कुठल्याही प्रवासात गामा शरद पवार यांच्या पालकत्वाचे कर्तव्य देखील पार पडताना दिसतो. दौऱ्या दरम्यान पवार यांचे प्रवासातील कपडे, तसेच औषधे या सर्व गोष्टींची जबाबदारी गामाकडे असते. गामा जेव्हा वाहन चालवत असतात तेव्हा शरद पवार गाडीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींसोबत काही महत्त्वाच्या विषयांवर बोलत असतात. परंतु या चर्चेतला एकही शब्द इकडचा तिकडे गामा कधीच करत नाही.

प्रवासादरम्यान पवार यांचा जेवणापासून ते औषधांच्या वेळा देखील थोड्याफार इकडे तिकडे झाल्या तरी संबंधित पदाधिकाऱ्यांना त्यासंबंधी आठवण करून द्यायला गामाचा पुढाकार असतो. अशा पद्धतीने गामा हे सर्वसामान्य व्यक्ती असले तरीसुद्धा प्रामाणिकपणे गेल्या पन्नास वर्षापासून शरद पवारांच्या सेवेत प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts