मारुती सुझुकी ही कार उत्पादक क्षेत्रातील एक अग्रगण्य आणि लोकप्रिय कंपनी असून या कंपनीच्या अनेक कार्सला ग्राहकांच्या माध्यमातून प्रचंड मागणी असल्याचे आपल्याला दिसून येते. गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय वाहन बाजारामध्ये या कंपनीने स्वतःचा एक दबदबा निर्माण केलेला आहे. ग्राहकांमध्ये मारुती सुझुकीच्या कार लोकप्रिय असण्याचे प्रमुख कारण म्हणजे परवडणारी किंमत, या किमतीत मिळणारे उत्तम मायलेज आणि वैशिष्ट्ये तसेच डिझाईन या गोष्टींचा समावेश करता येईल.
तसेच सातत्याने नवनवीन मॉडेल्स लॉन्च करणे हे देखील या कंपनीचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. अगदी याचप्रमाणे मारुती सुझुकी या कंपनीची एक सात सीटर कार पाहिली तर तिला बाजारामध्ये खूप मागणी दिसून येत असून अक्षरशः कंपनीकडे या कारची डिलिव्हरी पेंडिंग राहण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.
जर आपण मारुतीच्या या सीएनजी आवृत्तीची विक्री पाहिली तर जुलै 2024 मध्ये 43 हजार गाड्यांची डिलिव्हरी पेंडिंग आहे व ही मारुतीची कार आहे एर्टिगा 7 सीटर सीएनजी होय.सध्या मारुती सुझुकीकडे बारा सीएनजी मॉडेल असून मारुती एर्टिगा त्यापैकी एक आहे.
मारुती एर्टिगा सीएनजी देते जबरदस्त मायलेज
मारुती एर्टिगा सीएनजी मध्ये प्रामुख्याने VXi(O) आणि ZXi(O) या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असून या आवृत्तीमध्ये 1.5 लिटर, चार सिलेंडर आणि नॅचरल एस्पीरेटेड पेट्रोल इंजन देण्यात आले आहे व जे केवळ पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. पेट्रोल मोडमध्ये ही कार 102 बीएचपी पावर आणि 136 एनएम टॉर्क जनरेट करते.
तसेच सीएनजी मोडमध्ये ती 87 बीएचपी पावर आणि 121 एनएम टॉर्क देण्यास सक्षम आहे. महत्वाचे म्हणजे ही मारुती एर्टिगा सीएनजी ही 26.11 किलोमीटरचे मायलेज देते. याशिवाय या कारमध्ये तुम्हाला सात इंचाचा स्मार्ट प्ले प्रो टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तसेच अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सपोर्टसह कनेक्टेड कार तंत्रज्ञान मिळते.
या कारमध्ये सेफ्टी फीचर्स म्हणून क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलाईट तसेच चार एअरबॅग्स, ईबीडी सह एबीएस, ब्रेक असिस्ट, रियर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, ESP सह हिल होल्ड कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. तसेच या कंपनीने कारमध्ये क्लायमेट कंट्रोल एसी आणि पॅडल शिफ्टर्स सारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत.
किती आहे या कारची किंमत?
जर आपण मारुतीच्या या सीएनजी कारची किंमत पाहिली तर या कारची बेस व्हेरियंट आठ लाख 69 हजार रुपये एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध असून या कारचे टॉप व्हेरियंट तेरा लाख तीन हजार रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे.