Mhada Konkan Lottery : अलीकडे घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न हे लवकर पूर्ण होत नाही. विशेषतः मुंबई नवी मुंबई ठाणे वसई विरार याशिवाय राज्यातील इतरही महानगरात घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत.
परिणामी या महानगरात घर घेणारे नागरिक म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली स्वस्तातली घरे घेतात. यासाठी म्हाडा कडून लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जातो.
दरम्यान, म्हाडाच्या कोकण मंडळाने 4640 घरांसाठी सोडत जारी केली आहे. आता या सोडतीचा निकाल आज अर्थातच 10 मे 2023 रोजी ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी सकाळी दहा वाजता लागणार आहे.
हे पण वाचा :- 10वी पास, ग्रॅज्युएट तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स विभागात निघाली ‘या’ पदासाठी भरती, आजच करा अर्ज
म्हणजे आज कोकण मंडळाची ही लॉटरी उघडली जाणार आहे. ही लॉटरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढली जाणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार या 4640 घरांसाठी 48,805 लोकांनी अनामत रकमेसह अर्ज केले आहेत. यामुळे आता या लोकांमधून कोणत्या भाग्यवान लोकांना घर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान आज आपण ही लॉटरी किंवा सोडत घरबसल्या कशी पाहिली जाऊ शकते? तसेच या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची यादी कशी पहायची याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार
कुठं पाहणार लॉटरी
तुम्हाला आजची ही लॉटरी घरबसल्या स्मार्टफोनवरून बघायची असेल तर आपण bit.ly/konkan_mhada या लिंक वर क्लिक करून ही लॉटरी पाहू शकणार आहात. वेबकास्टिंग च्या माध्यमातून ही सोडत तुम्हाला घरबसल्या या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर दिसू शकणार आहे.
विजेत्यांची यादी कुठे पाहणार?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या सोडतीमध्ये ज्या लोकांना लॉटरी लागेल म्हणजे जें विजयी होतील अशा विजेत्यांची यादी म्हाडाकडून https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. तसेच विजेत्यांना म्हाडाकडून SMS देखील केला जाणार आहे. विजेत्यांना म्हाडाकडून तात्पुरतं देकारपत्र आणि सूचनापत्रही देण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- कडू कारल्याचा मधुर गोडवा ! प्रयोगशील शेतकऱ्याने 10 गुंठ्यात सुरु केली कारल्याची शेती, 2 लाखांची झाली कमाई, पहा ही यशोगाथा