Mhada Lottery 2023 News : जर आपणही म्हाडाचे घर घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नासिक, अमरावती यांसारख्या महानगरात घर घेणे म्हणजेच सर्वसामान्यांना न परवडणारी बाब बनली आहे.
अशा परिस्थितीत सर्वसामान्य म्हाडाच्या घरांना सर्वाधिक पसंती देत असतात. परवडणाऱ्या दरात म्हाडा कडून घरे उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिक कायमच म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. दरम्यान आता म्हाडाचे घर घेणे महाग होणार आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! ‘या’ कंपनीच्या स्टॉकने फक्त 3 वर्षात दिले 1000 टक्क्यांहुन अधिकचे रिटर्न, गुंतवणूकदार बनलेत मालामाल, पहा….
आता म्हाडा एक मोठा निर्णय घेणार असून म्हाडाच्या घरांच्या अनामत रकमेमध्ये वाढ होणार आहे. अत्यल्प गटासाठी 25 हजार तर अल्प गटासाठी 50 हजार रुपये अनामत रक्कम प्रस्तावित करण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे हा सदर प्रस्ताव आता लवकरच मंजुरीसाठी म्हाडाच्या उपाध्यक्षांपुढे ठेवला जाणार आहे.
अर्थातच म्हाडाच्या घरांसाठी आवश्यक अनामत रकमेत आता वाढ होणे हे जवळपास नक्की आहे. या निर्णयाचा मात्र नागरिकांकडून विरोध होत आहे. सर्वसामान्यांसाठी ही निश्चितच चिंताजनक बाब असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे. म्हाडाची घरे ही सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करून दिली जातात मग अनामत रकमेत वाढ केल्यास सर्वसामान्य लोक यासाठी अर्ज करतील का? हा देखील प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्हा परिषदेत 612 रिक्त पदांसाठी होणार भरती; वाचा सविस्तर
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, म्हाडाच्या मुंबई मंडळाने अनामत रकमेत वाढ होणार नाही असं नुकतच जाहीर केलं होतं. मात्र आता मुंबई मंडळाने आपल्या आधीच्या वक्तव्यावर युटर्न घेतला आहे. आता मुंबई मंडळातील घरांसाठी अत्यल्प गटासाठी 25 हजार रुपये, अल्प गटासाठी 50 हजार रुपये, मध्यम गटासाठी एक लाख रुपये आणि उच्च गटासाठी दीड लाख रुपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हाती आली आहे.
अर्थातच म्हाडाच्या वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी पाच टक्के ते दहा टक्क्यापर्यंत अनामत रकमेत वाढ करण्याचा विचार म्हाडाने केला असून यासाठीचा प्रस्ताव आता मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. निश्चितच या प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली तर सर्वसामान्य लोकांना या निर्णयाचा फटका बसू शकतो असे मत व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- अहमदनगरमध्ये नोकरीची संधी ! आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, वाचा सविस्तर