Mhada News : मुंबईला स्वप्ननगरी आणि मायानगरी म्हणतात. अशा या स्वप्ननगरीमध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानीत मात्र घर घेणं तितकं सोपं राहिलेलं नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे मुंबईमधील घराच्या किमती.
मुंबईमधील घरांच्या किमतीचा आलेख हा आता वाढला असे नव्हे तर गेल्या काही दशकांपासून सातत्याने मुंबईमधील घरांच्या किमती वाढतच आहेत. मुंबई ही प्रत्येकालाच हवीवीशी वाटते म्हणून येथे घर घेणाऱ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे.
मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. मात्र आता सर्वसामान्यांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने घरांची लॉटरी काढली आहे. यामुळे राजधानीत घर घेणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
किती घरांसाठी निघाली सोडत
आम्ही आपणास सांगू इच्छितो की म्हाडा मुंबई मंडळाने 4 हजार 38 घरांसाठी सोडत काढली आहे. यासाठी 22 मे 2023 पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी 26 जून 2023 पर्यंत मुदत नागरिकांना देण्यात आली आहे.
तसेच ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग ने या घरांसाठी अनामत रकमेसह अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 26 जून पर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र RTGS, NEFT पद्धतीने अनामत रक्कम भरण्यासाठी 28 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यानंतर या लॉटरीसाठी पहिली प्रारूप यादी जाहीर होणार आहे. नंतर मग अंतिम यादी जाहीर होईल आणि 18 जुलै 2023 रोजी मुंबई मंडळाच्या या मोठ्या सोडतीची प्रत्यक्षात लॉटरी काढली जाणार आहे. वास्तविक मुंबई मंडळाने जवळपास चार वर्षानंतर लॉटरी काढली आहे.
याआधी 2019 मध्ये लॉटरी निघाली होती आणि आता तब्बल चार वर्षानंतर म्हणजे 2023 मध्ये लॉटरी निघाली असून याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळणार असून लाखो अर्ज या घर सोडतीसाठी दाखल होणार असा दावा म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिलेत 1500% रिटर्न्स, 1 लाखाचे बनलेत 17 लाख; कोणता आहे हा शेअर, वाचा….
अर्ज भरताना अडचण आल्यास या नंबरवर संपर्क करा
या घर सोडतीसाठी लाखो अर्ज सादर होणार यात तीळमात्र देखील शंका नाही. कारण की, मुंबई मंडळाच्या सोडतीला कायमच लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी तब्बल चार वर्षांनी लॉटरी निघाली आहे तसेच लॉटरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सदनिकांची संख्या देखील अधिक आहे.
म्हणून यासाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येणार आहेत. अशा परिस्थितीत, इच्छुक लोकांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. अर्ज भरताना मात्र नागरिकांनी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. अर्ज हा केवळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच भरायचा आहे. अर्जात योग्य माहिती भरायची आहे.
आवश्यक कागदपत्रे देखील अर्ज भरतानाच सादर करायची आहेत. कागदपत्रांमध्ये आणि अर्जात दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळली तर अर्ज बाद होऊ शकतो यामुळे काळजी घ्यायची आहे. तसेच अर्ज करण्यात अडचणी आल्या किंवा काही शंका असतील तर 022-69468100 या क्रमांकावर नागरिक संपर्क साधू शकतात आणि आपल्या अडचणीचे निरसन करू शकतात.