MHADA News : म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांपर्यंत घरांची सोडत ही जारी केली जाते. प्रत्येकाचं आपला स्वतःच हक्काचं घर असावं असं स्वप्न असतं मात्र मुंबई पुणे नागपूर यांसारख्या मेट्रो शहरात स्वप्नाचे घर बनवणे म्हणजे केवळ स्वप्न पाहणं असाच झाल आहे. स्वप्नाच्या आशियानाच्या वाढत्या किमती पाहता मध्यमवर्गीय लोकांना या मोठ्या शहरात घर घेणं म्हणजे दिवसा चांदण्या पाहणं यासारखेचं आहे.
पण माढा अशा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या बजेटमध्ये घर उपलब्ध करून देते. नुकतेच म्हाडाच्या माध्यमातून कोकण मंडळांतर्गत घर सोडतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ठाणे वसई विरार या ठिकाणी घर सोडतीसाठी म्हाडाच्या माध्यमातून एकूण चार हजार 752 घरांच्या सोडतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण म्हाडाच्या घर सोडती संदर्भात रजिस्ट्रेशन पासून ते घर ताब्यात येईपर्यंत सविस्तर प्रोसेस समजून घेणार आहोत. तसेच यादरम्यान जी काही अडचण नागरिकांना भासत आहे किंवा या घर सोडतीच्या प्रक्रियेसंदर्भात जे काही लोकांचे प्रश्न आहेत त्याची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
म्हाडाच्या घरासाठी कोणाला अर्ज करता येतो?
हा प्रश्न बहुसंख्य लोकांकडून विचारला जातो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षांपासून रहिवासी असलेल्या नागरिकांनाच म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता येतो. याशिवाय म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांकडे पॅन कार्ड देखील असणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ज्या व्यक्तींच्या नावे आधीच घर आहे अशा व्यक्तींना या म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येत नाही. विशेष म्हणजे अशा व्यक्तींनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला तरी देखील या व्यक्तींची नावे गहाळ केली जातात.
अर्ज कुठे करायचा?
अनेकांना म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कुठे करावा लागतो याची माहिती नसते तर आम्ही आपणास सांगू इच्छितो यासाठी ऑनलाइन पद्धतीने म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. Lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक व्यक्ती अर्ज करू शकतात. या ठिकाणी आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी नोंदणी प्रक्रिया करावी लागते. तसेच नोंदणी करताना लॉगिन तपशील काळजीपूर्वक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच आता म्हाडाने आपल्या नवीन प्रणाली अंतर्गत प्रत्येक वेळी अर्ज करताना स्वातंत्रपणे लॉगिन करावे लागणार नसल्याचे सांगितले आहे.
म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात?
हा देखील अनेकांचा प्रश्न असतो. विशेष म्हणजे म्हाडाच्या नवीन नियमामुळे हा प्रश्न आता अधिक विचारला जात आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, म्हाडाच्या घरांसाठी आता आधी प्रमाणे 21 कागदपत्र लागणार नाहीत. फक्त सात कागदपत्र आता अर्ज करताना लागणार आहेत.
यामध्ये ओळखीचा पुरावा जसे की आधार कार्ड (सध्याचा पत्ता हवा), याशिवाय तहसीलदारांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र (QR कोडं हवा), तसेच उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे( यामध्ये उत्पन्नाचा दाखला, बँक स्टेटमेंट आणि सॅलरी स्लिप असणे आवश्यक राहणार आहे), शिवाय जातीचा दाखला देखील लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर कोट्याअंतर्गत अर्ज केला असेल तर कोट्यासाठी आवश्यक इतरही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. आणि यासोबतच सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच स्वयंघोषणापत्र जोडावे लागणार आहे.
म्हाडाचे घर असेल तर ते भाड्याने देता येईल का
हो देता येते.
म्हाडाचे घर विकता येते का?
जर म्हाडाचे घर कोट्याअंतर्गत प्राप्त केलं असेल तर प्रक्रिया थोडी वेगळी आहे. मात्र म्हाडाचे घर विकता येत. विशेष म्हणजे लॉटरी लागल्यानंतर घर सोडायचं असलं तरी देखील सोडता येतं.
म्हाडाची दोन घरे लागल्यास घेता येतात का?
पती-पत्नी अशा दोन्हींच्या नावावर म्हाडाची घरांची लॉटरी लागली तर मात्र पती किंवा पत्नीला एकच घर घेता येतं. कारण की पती आणि पत्नी सह मालक असतात. जर एखाद्याला दोन घरे घ्यायचे असतील तर असे व्यक्ति मुंबई आणि पुणे किंवा मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी अर्ज करू शकतात.
सिडकोचे घर असेल तरी देखील म्हाडाचे घर घेता येईल का?
हा सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न असून याचे उत्तर हो आहे. म्हाडाच्या घर सोडती संदर्भात काही अडचण असल्यास संपर्क कुठे करायचाआपण 02226598924/9834637538 या क्रमांकावर म्हाडाच्या घर सोडत संदर्भात काही अडचण असल्यास संपर्क करू शकणार आहात.