Mhada News : नवीन घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्यांना स्वस्तात नवीन घर घ्यायचे असेल त्यांच्यासाठी लवकरच म्हाडा नवीन घरे विकसित करणार आहे. खरंतर, म्हाडा प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी म्हाडा कडून आत्तापर्यंत अनेक गृह प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत.
दरम्यान सर्वसामान्यांसाठी म्हाडाने आणखी दोन महत्त्वाच्या गृहप्रकल्पाची घोषणा केली आहे. या गृहप्रकल्पामुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी ज्यांना घर हवं असेल त्यांच्यासाठी हा गृहप्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकण मंडळाने ठाण्यातील अंबरनाथ येथे दोन नवीन गृह प्रकल्पांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यासाठी निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात येत आहे. यासाठीची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.
यामुळे लवकरच या गृहप्रकल्पांचे काम पूर्ण होणार आहे आणि नागरिकांसाठी हजारो घरे उपलब्ध होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ मध्ये तयार होणाऱ्या या दोन गृहप्रकल्पातून जवळपास 1500 हुन अधिक घरे तयार होणार आहेत. ही घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
अंबरनाथ मध्ये कुठे विकसित होणार गृहप्रकल्प
कोकण मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथील शिवाजीनगर आणि कोहोज खुंटवली या दोन ठिकाणी दोन गृहप्रकल्प विकसित होणार आहेत. यातील शिवाजीनगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी 351 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 408 अशी एकूण 759 आणि कोहोज खुंटवली येथे अल्प उत्पन्न गटासाठी 354 आणि मध्यम गटासाठी 420 अशी एकूण 774 घरं म्हाडाकडून बांधली जाणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही प्रकल्पांच्या बांधकामासाठी म्हाडाने दोन वेगवेगळ्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे काम जलद गतीने पूर्ण होणार आहे. 21 ऑगस्टपर्यंत या दोन्ही गृहप्रकल्पांसाठी इच्छुक विकासकांना निविदा सादर करता येणार आहेत.
तसेच, 23 ऑगस्टला यासाठी तांत्रिक निविदा खुल्या होणार असल्याची माहिती प्राधिकरणाकडून समोर आली आहे. यानंतर मग टेंडरची प्रक्रिया अंतिम होईल आणि प्रत्यक्षात टेंडर दिले जाणार आहे.
टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होईल. विशेष म्हणजे बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर हे दोन्ही गृहप्रकल्प अवघ्या तीन वर्षात म्हणजेच 36 महिन्यांचा कालावधीत पूर्ण करायचे आहेत. यामुळे हे दोन्ही गृह प्रकल्प 2027 किंवा 2028 मध्ये पूर्ण होणार अशी आशा आहे.
यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या दोन्ही गृहप्रकल्पांमुळे भविष्यात हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अंबरनाथ सारख्या मोक्याच्या ठिकाणी घर असावे अशी अनेकांची इच्छा असते.
दरम्यान आता म्हाडा कोकण मंडळाने अंबरनाथ मध्ये हजारो घरे विकसित करण्याचा निर्णय घेतला असल्याने याचा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.