स्पेशल

आमदार आशुतोष काळे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, “कोपरगावच्या विकासात आड येणाऱ्यांना….”

MLA Ashutosh Kale News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदार संघातून आशुतोष काळे यांनी विजयी पताका फडकवली होती. त्यावेळी काळे यांनी कोपरगाव मधील पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करणार अशी घोषणाही केली होती.

महत्त्वाचे म्हणजे आशुतोष काळे यांनी केलेली घोषणा आता मूर्तरुप घेणार आहे. कारण की या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. या तलावाचे जलपूजन आमदार काळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे. यावेळी आमदार काळे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

या जल पूजनाच्या कार्यक्रमातून काळे यांनी विरोधकांच्या संधी साधू राजकारणावर टीका करत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील रणशिंग फुंकले आहेत. कोपरगावच्या विकासात आडे येणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत गाडून टाका असे म्हणत विधानसभा निवडणुकीपूर्वी काळे यांनी रणशिंग फुंकलेत.

ते म्हणालेत की विरोधकांनी हा साठवण तलाव होऊ नये यासाठी न्यायालयात तब्बल आठ याचिका दाखल केल्या होत्या. कोपरगाव चा पाणी प्रश्न संपुष्टात आला तर आपण राजकारण कशावर करायचे यामुळे आणि पाणी प्रश्नावरून सुरू असणारी आपली राजकीय दुकानदारी बंद होऊ नये यासाठी विरोधकांच्या माध्यमातून आठ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, असा गंभीर आरोप आमदार काळे यांनी विरोधकांवर केला.

यावेळी काळे यांनी विरोधकांना राजकारण कुठे करावे हे कळत नाही. या तलावासाठीचे मटेरियल समृद्धी महामार्गासाठी वापरत असताना विरोधकांनी तेथेही राजकारण केले. या तलावासाठी 134 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, यानंतर कोपरगाव नगर परिषदेला 15 टक्के रक्कम भरायची होती.

मात्र ही रक्कम नगर परिषदेला भरता येणार नाही अशा अफवा पसरवल्या गेल्यात. मात्र, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून ही रक्कम मी माफ करून आणली. यामुळे कोपरगावकरांचे जवळपास 20 कोटी रुपये वाचलेत.

या तलावाबाबत अनेक अफवा पसरवल्यात, अडथळे तयार करण्यात आलेत मात्र या सर्वांना आपण पुरून उरलो होतो आणि आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना खूपच आनंद होत असल्याची भावना काळे यांनी व्यक्त केली. यावेळी काळे यांनी विरोधकांच्या अनेक चुकीच्या धोरणांवर टीका केली.

यावेळी त्यांनी आता कोपरगाव चा विकास कोणीही थांबवू शकत नाही, कोपरगाव मध्ये विकासाचचं राजकारण होणार असे म्हणतं विरोधकांवर हल्ला चढवला. एकंदरीत काळे यांनी 2019 च्या निवडणुकीची घोषणा केली होती ती घोषणा आता पूर्ण होत आहे.

कोपरगाव चा पाणी प्रश्न आता निकाली निघणार आहे. काळे यांनी कोपरगाव मधील पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन करून आगामी निवडणूक आपण विकासाच्या राजकारणावरच लढवणार असे स्पष्ट केले आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts