Home Gadget:- तंत्रज्ञानाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा आमुलाग्र बदल घडवला असल्याने अनेक अवघड गोष्टी आता खूप सोप्या आणि सहज झालेल्या आहेत. तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी देखील तुम्हाला अगदी सहजपणे कुठलेही अवघड काम करता येते.
तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशी उपकरणे विकसित करण्यात आलेले आहेत की त्या उपकरणाच्या साह्याने तुमचे जीवन अगदी सुलभ आणि सहज झाले आहे.असेच काही गॅझेट अर्थात उपकरणांचा विचार केला तर त्या घरासाठी खूप महत्त्वपूर्ण असून ही उपकरणे जर तुम्ही घरात इन्स्टॉल केली तर तुम्ही तुमचे घर आधुनिक बनवू शकतात.
जसे आता स्मार्टफोनच्या साह्याने आपल्याला अनेक गोष्टी आरामात करता येतात.तसेच आता घरातील टीव्ही तसेच रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन अशी अनेक उपकरणे तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय स्मार्ट असे बनवण्यात आलेले आहेत.
अशा प्रकारचे स्मार्ट उपकरणे जर तुम्ही घरामध्ये बसवली तर तुमचे घर देखील आधुनिक आणि ऑटोमॅटिक होईल यात शंकाच नाही.विशेष म्हणजे अशी उपकरणे खूप स्वस्तामध्ये मिळत असल्याने अशी उपकरणे घरात बसवणे खूप फायद्याचे ठरू शकते.
ही उपकरणे घर बनवतील आधुनिक
1- स्मार्ट व्हिडिओ डोअरबेल- ही एक तंत्रज्ञानयुक्त अशी डोअर बेल असून यामध्ये कॅमेरा असतो व इंटरनेटशी कनेक्ट करून तुम्ही जगातून कोणत्याही ठिकाणहून तुमच्या घराची बेल कोणी वाजवली हे आरामात पाहू शकतात.
तसेच यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग हे फिचर देखील देण्यात आले असल्याने ही स्मार्ट व्हिडिओ डोअर बेल एक सीसीटीव्ही कॅमेरा सारखे सुरक्षेचे काम करते. या डोअर बेलची किंमत 2000 ते 5000 रुपयांपर्यंत आहे.
2- स्मार्ट प्लग- हा स्मार्ट प्लग खूप फायद्याचा असून तुम्ही अगदी घराच्या बाहेर देखील असाल तरी देखील तुम्ही एसी किंवा गिझर चालू करू शकतात. फक्त याकरिता तुमच्या वाटर हीटर किंवा एसीचा स्मार्ट प्लगमध्ये प्लग करावे लागेल व नंतर पावर स्विचशी जोडावे लागेल.
याकरिता स्मार्ट प्लगचे ॲप स्मार्टफोनशी कनेक्ट करावा. आता घराकडे निघताना फक्त आपला एसी चालू करण्याची सूचना द्या. अशाप्रकारे सूचना दिल्यानंतर तो चालू होतो.याची किंमत सुमारे एक हजार रुपये इतकी आहे.
3- वाय-फाय नोड स्मार्ट स्विच- वाय-फाय नोड स्मार्ट स्विच खूप फायदेशीर असून याचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी स्मार्ट अशा बनवू शकतात. हे स्विच तुम्ही बोर्डमध्ये बसवल्यानंतर तुम्ही तुमच्या फोनवरून स्वीच नियंत्रित करू शकतात. या नोड स्मार्ट स्वीचची किंमत ही नोडच्या संख्येनुसार वेगवेगळी असते व ती साधारणपणे 1000 ते 1500 रुपयेच्या दरम्यान असते.