स्पेशल

आनंदाची बातमी ! मोदी सरकारने आयोजित केली एक विशेष स्पर्धा ; “मन की बात” कार्यक्रमासाठी ‘हे’ काम केलं तर मिळणार 1 लाखाची रोख रक्कम ; आजच करा अर्ज

Modi Government Logo Design Competition : नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून आपल्या वेगवेगळ्या धडाकेबाज निर्णयामुळे संपूर्ण जगात प्रकाशझोतात आलेत. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतलेत. पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांशी संवाद साधण्यासाठी हाती घेतलेला मन की बात हा देखील असाच एक सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

दरम्यान आता या मन की बात कार्यक्रमाचा शंभर वा भाग एप्रिल 2023 मध्ये प्रसारित होणार आहे. याच प्रसंगाचे औचित्य साधून केंद्र शासनाने हा कार्यक्रम हायटेक बनवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान या कार्यक्रमाचा लोगो डिझाईन करण्यासाठी एका स्पर्धेचे देखील आयोजन झाले आहे. यासाठी अर्ज मागवले गेले असून उत्कृष्ट लोगो बनवणाऱ्यांना एक लाख रुपयांच बक्षीस दिल जाणार आहे.

दरम्यान या लोगो डिझाईनिंग साठीची अखेरची तारीख 1 फेब्रुवारी 2023 ही निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर आपणास लोगो डिझाईन करण्याचं कौशल्य प्राप्त असेल तर आपण या संधीचं सोनं करू शकता. त्यामुळे आज आपण ज्या लोकांना लोगो डिझाईन करण्यात इंटरेस्ट असेल त्यांनी या स्पर्धेसाठी कसा भाग घ्यायचा याविषयी महत्वपूर्ण अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

या स्पर्धेत भाग कसा घ्यायचा?

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मन की बात कार्यक्रमाच्या शंभरव्या भागाचे चित्रण करणारा एक लोगो तयार करावा लागणार आहे. तुम्ही तयार केलेला लोगो जर आकर्षक असला तर तुम्हाला देखील या स्पर्धेच्या अंतर्गत एक लाख रुपये मोदी सरकारच्या माध्यमातून देऊ केले जाणार आहेत.

दरम्यान, लोगो डिझाईन करताना काही बाबींची काळजी घ्यावी लागणार आहे. जस की तुम्ही जो लोगो डिझाईन करणार तो लोगो फक्त JPEG, JPG, PNG, SVG फॉरमॅटमध्ये अपलोड करावा लागणार आहे. तसेच हा लोगो डिजीटल प्लॅटफॉर्मवरच डिझाईन केलेला असणे आवश्यक राहणार आहे. तसेच लोगो हा कलरमध्ये डिझाइन केलेला असणे गरजेचे राहील म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट लोगो या ठिकाणी एक्सेप्टेबल राहणार नाही. याशिवाय लोगोचा आकार पोर्ट्रेट किंवा लँडस्केपमध्ये 5 सेमी×5 सेमी ते 60 सेमी×60 सेमी पर्यंत तयार केला जाऊ शकणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा मन की बात कार्यक्रमाच्या शंभरव्या भागाचे चित्रीकरण करणारा लोगो वेबसाइट किंवा ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी वापरला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लोगो डिझाईन करताना या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म साठी सुटेबल असा लोगो इच्छुक व्यक्तींना तयार करायचा आहे. यासह हा लोगो प्रेस रीलिझ, स्टेशनरी आणि साइनेज, लेबल इत्यादींमध्ये देखील वापरण्यास योग्य असला पाहिजे असं देखील सांगितलं गेलं आहे.

तसेच लोगो किमान 300 dpi सोबत हाय रिझोल्यूशनमध्ये असला पाहिजे. दरम्यान आपण या स्पर्धेसाठी इच्छुक असाल आणि आपणास अजून अधिक माहिती या स्पर्धेबाबत जाणून घ्यायची असेल तर आपण शासनाच्या https://secure.mygov.in/task/design-logo-100th-episode-mann-ki-baat/ या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. निश्चितच मोदी सरकारच्या या मन की बात कार्यक्रमाचा शंभरवा एपिसोड ऐतिहासिक बनवण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे.

तसेच या लोगो डिझाईन स्पर्धेच्या माध्यमातून शासन प्रतिभावान लोकांना प्रोत्साहित देखील करु इच्छित आहे. एकंदरीत जर आपल्याकडे लोगो डिझाईन करण्याचं कौशल्य असेल तर आपण या स्पर्धेचा लाभ घेऊन तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस मोदी सरकारकडून प्राप्त करू शकणार आहेत. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts