Modi Sarkar Yojana : केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. ज्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र व्यवसायासाठी भांडवल नाही अशा लोकांसाठी देखील केंद्रातील मोदी सरकार एक विशेष योजना राबवत आहे.
पीएम स्वनिधी योजना असे या महत्त्वाकांक्षी योजनेचे नाव आहे. केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली ही योजना पूर्णपणे केंद्रीय पुरस्कृत आहे. म्हणजेच या योजनेसाठीचा संपूर्ण खर्च हा केंद्रातील सरकारकडून केला जातो. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या नागरिकांना 80 हजार रुपयांचे कर्ज कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळते.
यामध्ये सरकारच स्वतः गॅरंटी घेते आणि पात्र लोकांना कर्ज देण्याचे काम करते. या योजनेतून दिल्या जाणाऱ्या कर्जावर सात टक्के व्याजदर आकारले जाते. कमीत कमी व्याजदरात सर्वसामान्य नागरिकांना व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मोटो आहे.
या योजनेअंतर्गत फुटपाथ वर दुकान लावणाऱ्या, स्ट्रीट स्टॉल लावणाऱ्या म्हणजे फळविक्रेते, भाजीविक्रेते यांना कर्ज मिळणार आहे. ही योजना लहान व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत या योजनेचा अनेकांनी लाभ घेतला आहे.
कोरोना काळात योजना फेरीवाल्यांना मोठी फायदेशीर ठरली. खरंतर कोरोना काळात फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांचा व्यवसाय चौपट झाला. लॉक डाऊन मुळे फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे फेरीवाल्यांना नव्याने व्यवसाय सुरू करता यावा हा उद्देश ठेवून कोरोना काळात ही योजना सुरू झाली.
याअंतर्गत फेरीवाल्यांना कमाल 80 हजाराचे कर्ज मिळते मात्र हे कर्ज तीन टप्प्यात दिले जाते. या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज केल्यावर लगेचच तुम्हाला १०,००० रुपये मिळणार आहेत. तर या रक्कमेची परतफेड केल्यावर तुम्हाला २०,००० रुपये मिळणार आहे.
त्यानंतर तुम्ही २०,००० रुपयांची परतफेड केली तर तुम्हाला ५०,००० रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला ८०,००० रुपयांच कर्ज मिळणार आहे. पीएम स्वनिधी योजनेत ७ टक्के व्याजदर आकारले जाते. याशिवाय डिजिटल व्यव्हार केल्यावर तुम्हाला वार्षिक १२०० रुपयांचा कॅश बॅक दिला जाईल.
या योजनेत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज हे कोणत्याही हमीशिवाय दिले जाते. मात्र या अंतर्गत उपलब्ध होणारे कर्ज हे कर्जदाराला एका वर्षाच्या आत फेडावे लागते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील बँकेत जाऊन या योजनेबाबत माहिती जाणून घेऊ शकता आणि बँकेतूनच या योजनेसाठी अर्ज करू शकता.