Molossia Country:- जगामध्ये अनेक देश असून साधारणपणे 200 च्या पुढे पृथ्वीवर देशांची संख्या आहे. प्रत्येक देशाचे वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, भौगोलिक विविधता आणि काही विशिष्ट गोष्टींमुळे खास ओळख आहे. तसेच काही देशांमध्ये असलेले पर्यटन स्थळे, अनेक प्रकारच्या वास्तू या संपूर्ण जगामध्ये देखील प्रसिद्ध आहेत.
प्रत्येक देशाला वेगवेगळ्या पद्धतीचे भौगोलिक वातावरण तसेच हवामान, प्राणी संपदा, मानवी जीवन व लोकसंस्कृती इत्यादी प्रत्येकच बाबतीत विविधता आपल्याला दिसून येते. तसेच राहणीमान व बोलीभाषा तर वेगळे आहेतच परंतु परंपरा व सण उत्सव देखील वेगवेगळे आहेत.
याच पद्धतीने या पृथ्वीतलावर असा एक देश आहे तो इतर प्रत्येक देशांपेक्षा पूर्णपणे वेगळा असून तो आकाराने देखील खूप छोटा असून त्या देशाचे नाव आहे मोलोसिया प्रजासत्ताक होय.
हा देश वसला आहे अवघ्या 11 एकर क्षेत्रावर
अमेरिकेच्या नेवाडा येथे असलेला 11 एकरच्या क्षेत्रावर वसलेल्या मोलोसिया प्रजासत्ताक हा अगदी छोटा देश असून त्याला ग्रँड रिपब्लिक ऑफ गोल्डस्टीन असे देखील म्हटले जाते. या देशाची स्थापना 1977 यावर्षी झाली असून अवघ्या 11 एकर क्षेत्रात विस्तारलेला हा देशाची लोकसंख्या 38 लोक इतकेच आहे.
या देशाला युनायटेड नेशन च्या माध्यमातून मान्यता नसली तरी देखील मोलोशिया प्रजासत्ताक या देशाची स्वतःची नौदल, नौदल अकादमी, अंतराळ कार्यक्रम तसेच रेल्वे मार्ग, पोस्टल सेवा, बँकिंग सेवा, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आकर्षणे, चित्रपट गृहे आणि ऑनलाईन रेडिओ स्टेशन आहे.विशेष म्हणजे हा अतिशय लहान देश असताना देखील या ठिकाणी राष्ट्रपती हे पद आहे व त्या देशाच्या राष्ट्रपतींचे नाव केविन वॉ असे आहे.
राष्ट्रपतींच्या म्हणण्यानुसार या देशाची एकूण लोकसंख्या जरी 38 असली त्या ठिकाणी आता फक्त तीन मानव आणि तीन कुत्रे राहतात. तसेच या ठिकाणी स्थानिक लोक असोत की परदेशी पाहुणे असो त्यांना कांदा, पालक आणि कॅटफिश खाण्यावर पूर्णपणे बंदी आहे.
याबद्दल मोलोशियाचे अध्यक्ष म्हणतात की, मला कांदे खायला आवडत नाही म्हणून इथे कांदा खाण्याची परवानगी नाही आणि मी हुकुमशहा असल्यामुळे मी असल्या गोष्टी बोलू शकतो. जर तुम्ही यासंबंधीचे नियम तोडले आणि आमच्या देशात कॅट फिश आणले तर शिक्षा म्हणून तुम्ही तुरुंगात देखील जाऊ शकतात. या ठिकाणी तुरुंग असून या तुरुंगाचा वापर प्रामुख्याने या देशांमध्ये प्रतिबंधित वस्तू जर कोणी आणल्या तर अशा पर्यटकांना ठेवण्यासाठी केला जातो.
अशा पद्धतीने संपूर्णपणे वेगळा असलेला हा देश आहे.