Monsoon 2023 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी अमेरिकन हवामान विभागाने एलनिनो या हवामान प्रणालीमुळे आशिया खंडात म्हणजेच भारतासह इतर आशिया खंडातील देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होईल असा अंदाज बांधला होता. अशातच आता जागतिक हवामान संघटना अर्थातच वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेने एलनिनोबाबत मोठी माहिती दिली आहे. या संघटनेने येत्या काही दिवसात एल निनोमुळे जागतिक स्तरावर तापमान वाढ होण्याचा इशारा दिला आहे.
या संस्थेने जारी केलेल्या निवेदनात सलग तीन वर्ष ला निना ही हवामान प्रणाली सक्रिय राहिल्यानंतर आता एल निनो ही हवामान प्रणाली सक्रिय होईल आणि यामुळे तापमान वाढ होणार असल्याचा दावा केला आहे. निश्चितच आधी अमेरिकन हवामान विभागाने एलनिनोबाबत चिंता व्यक्त केली आणि आता वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या संस्थेने एलनिनोमुळे तापमान वाढीचा इशारा दिला आहे.
एवढेच नाही तर तापमान वाढीच्या पुढे पावसावर देखील याचाच परिणाम होऊ शकतो असे या संस्थेने म्हटले आहे. म्हणजेच अमेरिकेच्या हवामान विभागात प्रमाणेच जागतिक हवामान विभागाने देखील एलनिनो बाबत इशारा यावेळी दिला आहे. तसेच या संस्थेने एल निनो विकसित होण्याची शक्यता वर्षांच्या पहिल्या सहामाहीमध्ये कमी असते अन एप्रिल ते जूनमध्ये ती सुमारे १५ टक्के असते तर मे ते जुलै दरम्यान ती ३५ टक्के पर्यंत वाढते असं देखील यावेळी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
तूर्तास या संस्थेने जून ते ऑगस्ट या कालावधीसाठी वर्तवण्यात आलेला अंदाज पाहता एल निनो विकसित होण्याची शक्यता ५५ टक्क्यांपर्यंत असणार आहे. मात्र यामध्ये बदल देखील होऊ शकतो. संभाव्य वातावरणीय अडथळ्यांमुळे यामध्ये बदल होणे शक्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच भारतीय हवामान तज्ञांनी आतापासूनच एलनिनो बाबत भीती बाळगून फायदा नसल्याचे सांगितले आहे.
जेष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रंजन केळकर यांनी देखील नुकत्याच काही दिवसांपूर्वी एल निनो जेवढ्या वेळेस सक्रिय झाला आहे त्याच्या पैकी निम्म्यावेळी भारतात चांगला समाधानकारक पाऊस पाहायला मिळाला आहे. यामुळे आत्तापासूनच भीती बाळगून उपयोग नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच काही तज्ञांनी याबाबत फेब्रुवारी, मार्च महिन्यात वर्तवलेला अंदाज अनेकदा फोल ठरला असल्याचे मत नमूद केले आहे. तसेच एप्रिल महिन्यात येणाऱ्या भारतीय हवामान विभागाच्या अंदाजावर एलनिनो बाबत योग्य ती स्पष्टोक्ती येऊ शकेल असे देखील म्हटल आहे.