Monsoon 2024 News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. काल राज्याच्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले. अशातच आता भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात मोठी माहिती दिली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचा मुक्काम लांबणार आहे.
गेल्या वर्षी मानसून काळात खूपच कमी पाऊस झाला होता. यंदा मात्र मान्सूनच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तसेच यावर्षी ऑक्टोबर मध्ये ही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज 20 सप्टेंबर पासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे.
20 सप्टेंबर पासून ते 22 सप्टेंबर पर्यंत राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात राज्यात अधून मधून कडक ऊन सुद्धा पडणार आहे. तदनंतर मात्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 23 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
23 सप्टेंबर नंतर रोज 23 ते 40 एम एम एवढ्या पावसाची शक्यता आहे. परंतु मुसळधार पावसाचे आगामी काही दिवस कोणते संकेत मिळत नसल्याचे दिसत आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही.
मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते. भारतीय मानसून साठी पोषक असणारा ला-निना अजून सक्रिय झालेला नाही. परंतु ऑक्टोबर मध्ये ला-निना सक्रिय होईल आणि मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
यामुळे राज्यातील नागरिकांना ऑक्टोबर हिट पासून दिलासा मिळणार आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान हे नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. यामुळे ऑक्टोबर हिट चा उकाडा कमी प्रमाणात जाणवणार आहे. या ला-निना मुळे यंदा मान्सूनचा मुक्काम लांबणीवर पडणार आहे.
त्यामुळे परतीच्या पावसाला देखील उशिराने सुरुवात होणार आहे. तथापि, परतीचा पाऊस नेमका कधीपासून सुरू होणार या संदर्भात अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला परतीच्या पावसा संदर्भात योग्य ती माहिती समोर येऊ शकणार आहे. पण यावर्षी मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता अनेक जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे.