Monsoon 2024 : महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मान्सून आता लवकरच परतणार आहे. अशातच भारतीय हवामान खात्याकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
यामुळे आता राज्यात परतीचा पाऊस जोर पकडणार आहे. आज अर्थातच 5 ऑक्टोबर पासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, गुरुवारी राजस्थानसह काश्मीर, लडाख, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतीला निघाला आहे. यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय होणार आहे.
हा परतीचा पाऊस 4 ऑक्टोबर पासून सक्रिय झाला असून पुढील तीन दिवस म्हणजेच 7 ऑक्टोबर पर्यंत राज्यात परतीच्या पावसाची शक्यता आहे. राज्यात पाच, सहा आणि सात ऑक्टोबरला काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आता आपण हवामान खात्याने राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
5 ऑक्टोबर 2024 : आज जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
6 ऑक्टोबर 2024 : उद्या अर्थातच सहा ऑक्टोबरला राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली,सोलापूर, बीड, नांदेड, धाराशिव, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
7 ऑक्टोबर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.