Monsoon Arrival Date : शेतकऱ्यांसाठी मान्सून हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. भारतीय शेतीची सर्वस्वी मान्सूनच्या पावसावर आधारित आहे. म्हणून मे महिना सुरु झालला की शेतकऱ्यांना आतुरता लागते ती मान्सून आगमनाची.
दरम्यान शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. म्हणजे मान्सूनचे आगमन दबक्या पावलांनी लवकरच होणार आहे.
मान्सून महाराष्ट्रात दबक्या पावलांनी दाखल होणार असून लवकरच उकाड्याने त्रस्त नागरिकांना तृप्त करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकाला संजीवनी देणार आहे. मात्र असे असले तरी यंदा मान्सूनचे आगमन हे सामान्य कालावधीपेक्षा उशिरा होणार आहे.
यामुळे निश्चितच ही बातमी थोडीशी निराशाजनक आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत एक महत्त्वाचे अपडेट जारी केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मान्सूनचे चार जूनला केरळमध्ये आगमन होणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे केरळमध्ये मान्सून हा एक जूनला प्रवेश करतो. यंदा मात्र 4 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे. अर्थातच तीन दिवस उशिरा मान्सून आगमनाचा अंदाज आयएमडीने बांधला आहे. दरम्यान पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार चार जूनला केरळला आणि सहा जूनला आपल्या महाराष्ट्रातील तळ कोकणात मान्सून दाखल होणार आहे.
मग तेथून पुढे मान्सून हा 10 किंवा 11 जून रोजी मुंबईमध्ये दाखल होणार आहे. एकंदरीत दबक्या पावलांनी येणारा हा मानसून उशिरा दाखल होत असल्याने शेतकऱ्यांचे सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दिसत आहेत.
यातच मात्र शेतकऱ्यांसाठी आशादायी आणि आनंदाची बातमी देखील भारतीय हवामान विभागाचे माध्यमातून समोर येत आहे. आय एम डी च्या मते यंदा 96% पाऊस पडणार आहे. मात्र मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात एलनिनोचा प्रभाव राहणार आहे.
यामुळे दुसऱ्या सत्रात कमी पावसाची शक्यता असेल. यामुळे आता मान्सून काळात किती पाऊस पडतो हे तर आता प्रत्यक्ष मान्सून दाखल झाल्यानंतरच समजणार आहे.