Monsoon News 2023 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी एक चिंतेची बाब समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने काल-परवा वर्तवलेल्या आपल्या हवामान अंदाजानुसार राज्यात दोन मे पर्यंत पावसाची शक्यता कायम होती. मात्र आता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सुधारित हवामान अंदाज वर्तवला आहे.
खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात चार मे 2023 पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यामुळे निश्चितच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचे ढग तयार होत आहेत. आधीच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान अवकाळीने केले आहे.
अशातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा राज्यातला मुक्काम लांबला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर असून आता उन्हाळा संपत असतांना पडत असलेला हा पाऊस पुढील मान्सूनवर विपरीत परिणाम करेल की काय? अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज एक मे 2023 रोजी अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यात गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे.
सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात मात्र पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे. दरम्यान माणिकराव खुळे यांनी चार मे पर्यंत राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागात गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार असल्याचा आपला अंदाज सार्वजनिक केला आहे. यामुळे या संबंधित विभागातील शेतकऱ्यांना तसेच सामान्य जनतेला विशेष सजग आणि सतर्क राहायचे आहे.
एकंदरीत आज एक मे 2023 रोजी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर नासिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यात पावसाची तीव्रता ही अधिक राहणार आहे.
मध्य महाराष्ट्रातील वर नमूद केलेल्या उर्वरित जिल्ह्यात मात्र किरकोळ पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यात देखील जिल्ह्यातील अनेक गावात गारपीट झाली आहे.
कोणत्या विभागात पडणार पाऊस?
आज मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या दोन मे 2023 रोजी विदर्भात पावसाची तीव्रता वाढलेली राहणार आहे आणि त्या अनुषंगाने विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
तसेच तीन मे 2023 रोजी मध्ये महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट राहणार आहे.