स्पेशल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मोबाईल वरून घरबसल्या अर्ज कसा करायचा ? पहा ए टू झेड माहिती

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये याचा जीआर देखील निघाला. दरम्यान या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच वार्षिक 18 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

महिला, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ मिळणार आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र राहतील. फक्त राज्यातीलच महिलांना याचा लाभ मिळणार आहे. लग्नापूर्वी परराज्यात असणाऱ्या अन राज्यातील पुरुषासोबत लग्न करणाऱ्या महिला सुद्धा यासाठी पात्र राहतील. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

महिलांच्या सोयीसाठी राज्य शासनाने या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी एक ॲप्लिकेशन देखील डेव्हलप करण्यात आले आहे. दरम्यान आज आपण मोबाईलचा वापर करून या योजनेसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

मोबाईल ॲप्लिकेशन वरून अर्ज कसा करायचा

राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे हेतू नारीशक्ती दूत हे ॲप्लीकेशन डेव्हलप केले आहे. हे एप्लीकेशन प्ले स्टोअर वर निशुल्क उपलब्ध आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot या लिंकवर जाऊन तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे.

एकदा मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केले की तुम्ही या योजनेसाठी सहजतेने अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या एप्लीकेशन मध्ये लॉगिन घ्यावे लागणार आहे. यासाठी मोबाईलनंबर, OTP अन term and condition वर क्लिक करून लॉगिन करायचे आहे. यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा हा पर्याय दिसणार आहे.

यात तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. एवढी माहिती भरल्यानंतर तुमची प्रोफाइल अपडेट होणार आहे.

प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला नारीशक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या पर्यायावर क्लिक करा. मग यानंतर तुम्हाला लोकेशन ऑन करण्यास सांगितले जाईल. यानंतर स्क्रीनवर या योजनेचा फॉर्म उघडेल.

हा फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. येथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहात की नाही याची माहिती भरायची आहे. वैयक्तिक माहिती भरल्यानंतर बँकेचा तपशील भरावा लागणार आहे.

यानंतर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. यानंतर तुम्हाला एक्सेप्ट डिक्लेरेशन डिस्क्लेमर या पर्यायावर क्लिक करून या योजनेच्या अटी आणि शर्ती Accept करायच्या आहेत.

त्यानंतर तुम्ही भरलेला संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक वाचा, कागदपत्रे व्यवस्थित अपलोड झाली आहेत की नाही याची खात्री करा मग सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या रकान्यात टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts