स्पेशल

Multibagger Penny Stocks: ‘या’ शेअर्सने बाजारात केली धमाल! गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे महिनाभरात झाले 2 लाख, वाचा या शेअर्सची माहिती

Multibagger Penny Stocks:- सध्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळत असून जर आपण काल 31 मे चा विचार केला तर काल बाजारामध्ये काहीशी तेजी पाहायला मिळाली होती. काल साधारणपणे सेन्सेक्स 560 हून अधिक अंकाच्या वाढीसह 74440 चे पातळीवर व्यवहार करत होता तर निफ्टी देखील 140 अंकांनी वाढून 22 हजार 630 च्या पातळीवर व्यवहार करत होती.

काल सेन्सेक्स मधील 30 समभागांपैकी 28 शेअर्समध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले तर दोन शेअर्समध्ये घट झाल्याचे चित्र होते. सध्या लोकसभा निवडणुकीचा निकाल नेमका चार तारखेला काय येतो यावर शेअर बाजारातील तेजी किंवा घसरण अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.

परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये पेनी स्टॉक रतन इंडिया पावर लिमिटेडच्या शेअर्सने मात्र गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर परतावा दिला आहे.

साधारणपणे एका महिनाभरापूर्वी ९.२० रुपयावर असलेला हा शेअर्स आजच्या घडीला 18.90 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअर्सने एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.05 लाख रुपये केले आहे.

 रतन इंडिया पावर लिमिटेडने गुंतवणूकदारांना एका महिन्यात दिला 105 टक्क्यातून अधिक परतावा

साधारणपणे एका महिनाभरापूर्वी 9.20 रुपये असलेला हा शेअर्स आजच्या घडीला 18.90 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच पेनिस्टॉक रतन इंडिया पावर लिमिटेड एक लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 2.05 लाख रुपये केले आहे.

म्हणजेच गुंतवणूकदारांना या कालावधीत तब्बल 105 टक्क्यांनी अधिकचा परतावा मिळाला. एवढेच नाही तर गेल्या पाच दिवसाच्या कालावधीत या शेअर्सला चार वेळा अप्पर सर्किट देखील लागले. गुंतवणूकदारांना जवळपास 20 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.

 गुंतवणूकदारांच्या एक लाखाचे एका वर्षात झाले 5.65 लाख

रतन इंडिया पावर लिमिटेडच्या या शेअर्सने एका वर्षामध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 464 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला असून या शेअर्सने मल्टीबॅगर शेअरच्या यादीमध्ये स्थान पटकावले आहे.

म्हणजेच एखाद्याने एक वर्षापूर्वी रतन इंडियाचे शेअर्स 3.35 रुपयांना विकत घेऊन एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्या गुंतवणुकीचे मूल्य आता पाच लाख 65 हजार रुपये होईल. जर आपण रतन इंडियाच्या या शेअर्स जी 52 आठवड्यांची कामगिरी पाहिली तर 52 आठवड्यांचा उच्चांक 19.15 आणि निचांकी स्तर 3.15 आहे.

 परदेशी गुंतवणूकदार या पेनिस्टॉक कडे झाले आकर्षित

विदेशी गुंतवणूकदार या पेनिस्टॉककडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले असून जर त्याची आकडेवारी पाहिली तर डिसेंबर तिमाहीतील 0.76 टक्क्यांवरून शेअर होल्डिंग 2.04 टक्क्यांवर नेण्यात आली आहे.

तसेच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील आपला हिस्सा 0.09 टक्क्यांवरून 0.11% नेला आहे. तसेच यामध्ये म्युच्युअल फंडाचा मोठा वाटा असून इतरांकडे जवळपास 53.79% हिस्सा आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts