स्पेशल

काय सांगता ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिलेत 1500% रिटर्न्स, 1 लाखाचे बनलेत 17 लाख; कोणता आहे हा शेअर, वाचा….

Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत जे कमी कालावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना लाखों रुपयांचा परतावा देतात. अनेक गुंतवणूकदार अशा स्टॉक मध्ये गुंतवणूक करून मालामाल बनले आहेत. वास्तविक शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

यानुसार अनेक गुंतवणूकदार लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्यालाच पसंती दाखवतात. यामुळे त्यांना चांगला फायदा देखील मिळतो. मात्र आज आपण अशा एका मल्टीबॅगर स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत ज्याने अवघ्या तीन वर्षांच्या काळात तब्बल 1500% परतावा देण्याची किमया साधली आहे.

हो, बरोबर वाचलय तुम्ही. आज आपण अशा एका स्टॉक ची माहिती जाणून घेणार आहोत जो 2020 मध्ये आठ रुपये आणि 69 पैशांवर ट्रेड करत होता मात्र आता तीन वर्षानंतर हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 157 रुपये आणि 25 पैशांवर ट्रेड करत आहे.

निश्चितच आता तुम्हाला या स्टॉक संदर्भात जाणून घेण्याची आतुरता लागली असेल चला तर मग अधिक वेळ न वाया घालवता या स्टॉकच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया.

हे पण वाचा :- मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट, प्रवाशांच्या अर्धा तासाचा वेळ वाचणार; प्रकल्पाचे काम केव्हा होणार पूर्ण ? MSRDC अधिकारी म्हणतात….

कोणता आहे तो स्टॉक?

हा स्टॉक आहे हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेडचा. ही कंपनी स्टील फोर्ज्ड फ्लँगेस, फिटिंग्स, ऑयलफिल्ड आणि मरीन उत्पादन निर्मिती आणि वितरणातील प्रमुख कंपनी आहे. ही कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी उत्पादन तयार करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीचा हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 22 मे 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर आठ रुपये आणि 69 पैशांवर ट्रेड करत होता. आणि काल अर्थात 27 मे 2023 रोजी हाच स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 157 रुपये आणि 25 पैशांवर ट्रेड करत होता. म्हणजेच या तीन वर्षाच्या काळात या स्टॉकने 1500% रिटर्न्स आपल्या गुंतवणूकदारांना दिले आहेत.

हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार नाही सातवा वेतन आयोगाची थकबाकी? वाचा…

याचाच अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केली असेल आणि आजपर्यंत ही गुंतवणूक होल्ड करून ठेवली असेल तर अशा गुंतवणूकदाराचे एका लाखाचे 17 लाख 59 हजार रुपये बनले असतील. निश्चितच या स्टॉक मध्ये तीन वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार चांगलेच मालामाल बनले आहेत.

मित्रांनो, येथे दिलेली माहिती ही स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात असते. म्हणून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा आर्थिक सल्ला ठरणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ ‘या’ 50 गावात बांधली जाणार सभागृह ! अहमदनगरमधील ‘त्या’ गावांचाही आहे समावेश, गावांची यादी पहा…

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts