Mumbai Expressway News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. या नवीन महामार्गांमुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्प प्रस्तावित आहेत. तसेच काही महामार्ग प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. नजीकच्या काळात आणखी काही महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
कोकण ते गोवा हा प्रवास जलद व्हावा यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नवीन कोकण एक्सप्रेस वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान आता याच महामार्ग प्रकल्पासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारने या प्रकल्पाची रुपरेषा जाहीर केले आहे. खरे तर या महामार्गाची लांबी 376 किलोमीटर एवढी राहणार आहे. यासाठी जवळपास 69 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हा एक सहा पदरी महामार्ग राहणार असून दोन सर्विस रोड देखील राहणार आहेत. यामुळे या महामार्गालगतच्या स्थानिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
या महामार्ग प्रकल्प अंतर्गत 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 ओवर पास बनवले जाणार आहेत. सध्या मुंबई ते गोवा हे अंतर 460 किलोमीटर एवढे आहे. मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हे अंतर त्यांचे 76 किलोमीटरवर येणार आहे.
यामुळे मुंबई ते गोवा दरम्यान चा प्रवास जलद होणार आहे. सध्या मुंबई ते गोवा असा प्रवास पूर्ण करण्यासाठी 12 तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय मात्र जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी सात तासांवर येणार आहे.
मुंबईहून गोवा आणि गोव्याहून मुंबईला येणाऱ्यांना नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे. कोकणातील नागरिकांना या एक्सप्रेस वे चा सर्वाधिक फायदा होणार असून मुंबईहून कोकणात जाण्यासाठी तीन महामार्ग पर्याय आगामी काळात नागरिकांपुढे उपलब्ध राहणार आहेत.
अलिबाग ,शहाबाद, रोहा, घोसळे, माणगाव, मढेगाव, मंडणगड, केळवट, दापोली, वाकवली, गुहागरशहर, रत्नागिरी, गणपतीपुळे, राजापूर, भालवली, देवगड शहर, मालवण शहर ,कुडाळ, सावंतवाडी शहर, वेंगुर्ले बांदा येथून हा महामार्ग जाणार आहे.
यासाठी 3792 हेक्टर जमिनीचे संपादन करायचे आहे. सरकारने या महामार्गाची रूपरेषा जाहीर केली असल्याने येत्या काही दिवसांनी या प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.