Mumbai Goa Travel Time Reduce : मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. शिवाय मुंबई हे एक महत्त्वाचं जागतिक पर्यटन स्थळ आहे. तसेच गोवा हे देखील भारतातील एक महत्त्वाचं पिकनिक डेस्टिनेशन आहे.
अशा परिस्थितीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्यांची आणि गोव्याहुन मुंबईला येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दरम्यान मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. खरं पाहता, आता मुंबई ते गोवा हा प्रवास दोन तास लवकर होणार आहे.
कारण की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. आता तुम्ही म्हणाल मुंबई ट्रांसफार्मर लिंकचा आणि मुंबई ते गोवा प्रवासाचा संबंध काय? पण या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते गोवा प्रवास सुसाट होणार आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्याच्या ‘या’ महापालिकेत निघाली मोठी भरती, थेट मुलाखतीने होणार उमेदवाराची निवड, पहा….
वास्तविक हा प्रकल्प मुंबईला आणि नवी मुंबईला परस्परांना कनेक्ट करतो. हा सागरी पूल म्हणजे मुंबई कोस्टल रोड प्रकल्प पूर्वेकडील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पश्चिमेकडील कोस्टल रोडशी जोडत आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांना गोव्यात जाणे आता आणखी सोपे होणार आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या मार्गाने मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करण्यासाठी दोन तासांहून अधिकचा वेळ प्रवाशांना खर्च करावा लागत आहे. परंतु ट्रान्स हार्बर लिंक वरून प्रवास केल्यास मुंबई ते नवी मुंबई हे अंतर 20 ते 25 मिनिटात पार होईल असा दावा केला जात आहे. साहजिकच या मार्गामुळे मुंबई ते गोव्याच्या प्रवासातील अंतरही कमी होणार आहे.
कसा आहे हा प्रकल्प?
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून राजधानी मुंबई आणि उपनगरात वेगवेगळ्या विकासाची कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई कोस्टल रोड प्रकल्प या सागरी मार्गाचा देखील समावेश होतो. हा मार्ग दक्षिण मुंबईतील शिवडी येथून सुरू होतो आणि एलिफंटा बेटाच्या उत्तरेला ठाणे खाडी ओलांडल्यानंतर चार्लीजवळ संपतो.
या मार्गाची 22 किलोमीटर एवढी लांबी आहे. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण प्रकल्पासाठी 17,843 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकंदरीत मुंबई आणि नवी मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प मुंबईहून गोव्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी केव्हा सुरू होतो? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
हे पण वाचा :- 8वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात निघाली भरती, पगार मिळणार 60 हजाराहून अधिक, पहा डिटेल्स