Mumbai Goa Vande Bharat Express : मार्च 2023 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असं सुतोवाच केले होते. यानुसार मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसची नुकत्याच चार ते पाच दिवसांपूर्वी यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
ट्रायल रन या मार्गावर यशस्वी झाल्यानंतर ही गाडी नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषता कोकणवासीयांना जाणून घेण्याची विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.
अशातच काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये मुंबई ते गोवा दरम्यान अर्थातच सीएसएमटी ते मडगाव दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस 29 मे पासून सुरू होणार असून या गाडीला दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती समोर येत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या गाडीचे वेळापत्रक, तिकीट दर आणि ही गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबू शकते याबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! दहावी, बारावी बोर्डाचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; महाराष्ट्र राज्य बोर्ड करणार तारखेची घोषणा
कसं राहणार वेळापत्रक?
मुंबई ते गोवा दरम्यान सुरू होणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकाबाबत अधिकारीक माहिती अद्याप हाती आलेली नाही. मात्र ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी साडेपाच वाजता रवाना होईल आणि दुपारी साडेबारा वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल असा अंदाज आहे.
यानंतर ही गाडी मडगाव रेल्वे स्थानकावर एक तास थांबेल आणि त्यानंतर मडगाव रेल्वे स्थानकावरून ही ट्रेन दुपारी दीड वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
कोणत्या स्थानकावर थांबणार?
या ट्रेनला कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. परंतु ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मिळण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक ठिकाणी थांबा दिला जाणार आहे.
किती राहणार तिकीट दर?
एका मीडिया रिपोर्टनुसार, सीएसएमटी ते मडगाव दरम्यान या ट्रेनमध्ये चेअर क्लास ने प्रवास केला तर 1580 रुपये तिकीट लागेल तसेच एक्झिक्यूटिव्ह चेअर क्लास ने प्रवास केला तर 2870 रुपये तिकीट दर आकारला जाईल अशी शक्यता आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ शाळांचे वेळापत्रक बदलणार, 2 सत्रात भरणार शाळा; मंत्री गावित यांची माहिती