Categories: स्पेशल

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! नवीन वंदे भारत मडगावकडे रवाना; केव्हा होणार उदघाट्न? पहा….

Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषता कोकणवासियांना आतुरता लागून आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची.

या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन केव्हा सुरू होते? याकडे कोकणातील प्रवासी विशेष लक्ष ठेवून आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. साहजिकच चाचणी यशस्वी झाल्याने आता या मार्गावर ही हायस्कूल ट्रेन सुरू होणे अपेक्षित आहे.

मात्र या मार्गावरील ही ट्रेन केव्हा सुरू होणार याबाबत भारतीय रेल्वे बोर्डाकडून किंवा रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीच माहिती मिळालेली नाही. परंतु या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी हालचाली तेज झाल्या आहेत.

एका सुप्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते मडगाव दरम्यान चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा नवा कोरा रेक चेन्नई येथील कोच फॅक्टरी येथून काल शनिवारी अर्थातच 27 मे 2023 रोजी मडगाव रेल्वे स्टेशनकडे रवाना झाला आहे.

याचाच अर्थ या मार्गावर येत्या काही दिवसातच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे चित्र आहे. मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील असे सूत्रांनी सांगितले असून आता मडगाव रेल्वे स्थानकाकडे चेन्नई येथील कोच फॅक्टरी मधून आठ डब्यांचा वंदे भारतचा नवा कोरा रेक रवाना देखील झाला आहे. हा नवा रेक काल 27 मे ला रात्री साडेदहा वाजता उडपी स्थानक सोडून मडगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला आहे.

याचाच अर्थ येत्या काही तासात मडगाव मध्ये हा नवा कोरा रेक पोहोचणार आहे. साहजिकच आता उद्घाटनाची तारीख देखील रेल्वे कडून जाहीर केली जाणार आहे. दरम्यान मडगाव रेल्वे स्थानकावर या ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होणार असल्याने त्या ठिकाणी आवश्यक सर्व पूर्वतयारी पूर्ण झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

एकंदरीत सीएसएमटी ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली असून आता वंदे भारतचा नवा कोरा रेक हा मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. म्हणून लवकरच आता मुंबई ते गोवा हा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने सुसाट होणार असल्याचे चित्र आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts