Mumbai Goa Vande Bharat Train Inauguration cancel : मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती येत आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणारी ही हायस्पीड ट्रेन 3 जून 2023 रोजी शनिवारी अर्थातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सीएसएमटी मडगाव वंदे भारत ट्रेन ला आज हिरवा बावटा दाखवणार होते. या उद्घाटनकार्यक्रमासाठी गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
मात्र आता हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पंतप्रधान मोदी सीएसएमटी मडगाव वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार नाहीत.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक; ‘या’ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान भरपाई !
आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, ओडिसा येथील बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाला आहे. या भीषण रेल्वे दुर्घटनेमध्ये अनेक रेल्वे प्रवाशी मृत्युमुखी पडण्याची भीती आहे. काल शुक्रवारी सायंकाळी उशिराने ही घटना घडली आहे.
यामुळे या भीषण दुर्घटनेनंतर सीएसएमटी मडगाव वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरम्यान आता मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन केव्हा सुरू होणार याबाबत प्रवाशांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा उदघाटनाचा कार्यक्रम अचानक रद्द झाला असल्याने आता केव्हा उद्घाटन होईल या संदर्भात अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र लवकरच रेल्वे कडून या सीएसएमटी मडगाव वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली जाणार आहे.
हे पण वाचा :- कारल्याच्या ‘या’ जातीची लागवड करा; विक्रमी उत्पादन मिळणार !
मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन
सध्या मुंबई ते गोव्या दरम्यान सुरू असलेल्या एक्सप्रेस गाड्या मुंबई ते गोवा हा प्रवास दहा तासात पूर्ण करतात. मात्र वंदे भारत ट्रेन हा प्रवास केवळ सात तासात पूर्ण करण्यास सक्षम आहे.
साहजिकच या मार्गावर ही गाडी सुरू झाल्यानंतर येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय या गाडीचा कोकणवासियांना सर्वाधिक फायदा होणार आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या पाहता या गाडीला चांगला प्रतिसाद मिळण्याची देखील शक्यता आहे.
हे पण वाचा :- गुड न्युज आली ! मान्सून केरळात दाखल? भारतीय हवामान विभागाची माहिती, ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस