स्पेशल

मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाहीर; केव्हापासून धावणार, कुठं राहणार थांबा? वाचा…..

Mumbai Goa Vande Bharat Train : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या आणि कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव रेल्वे स्थानका दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. या हाय स्पीड ट्रेनचे नुकतेच ट्रायल रन कम्प्लीट करण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ट्रायल रन साठी मुंबई शिर्डी मार्गावर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे रेक वापरण्यात आले होते.

दरम्यान ट्रायल रन कम्प्लीट झाल्यानंतर आता चेन्नई येथील कोच फॅक्टरी मधून या मार्गासाठी वंदे भारतचे रेक देखील मडगाव कडे रवाना झाले आहेत. म्हणजेच आता या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे कडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

हे पण वाचा :- अहमदनगर, नासिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अन ‘या’ जिल्ह्यात 29 आणि 30 मे ला पाऊस पडणार ! तुमच्या भागात कसं राहणार हवामान? पहा…

केव्हा सुरु होणार ट्रेन?

मिळालेल्या माहितीनुसार सीएसएमटी ते मडगाव दरम्यान 15 जून 2023 पासून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. 15 जून रोजी या हायस्पीड ट्रेनला दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा बावटा दाखवणार आहेत. हा उद्घाटनाचा कार्यक्रम मडगाव रेल्वे स्थानकावर होणार असून यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत.

याबाबत मात्र भारतीय रेल्वे कडून कोणतीच अधिकारीक माहिती हाती आलेली नाही. परंतु एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन 15 जून 2023 रोजी सुरू केली जाणार आहे. निश्चितच यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिलेत 1500% रिटर्न्स, 1 लाखाचे बनलेत 17 लाख; कोणता आहे हा शेअर, वाचा….

कसं राहणार वेळापत्रक

हाती आलेल्या माहितीनुसार, CSMT येथून ही गाडी सकाळी साडे पाच वाजता मडगाव कडे रवाना होणार आहे आणि दुपारी साडेबारा वाजता मडगाव स्थानकात पोहचणार आहे. तसेच हीच गाडी मडगाव येथून दुपारी दिड वाजता मुंबईकडे रवाना होणार असून रात्री साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचणार आहे. ही गाडी मंगळवार वगळता सर्व दिवस सुरू राहणार आहे. भारतीय रेल्वे कडून मात्र या वेळापत्रकची पुष्टी करण्यात आलेली नाही. परंतु हेच वेळापत्रक लागू होऊ शकते असा दावा केला जात आहे.

कोणत्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला या मार्गावरील दादर, ठाणे, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वे थांबा देणार असल्याचे सांगितले जात आहे.

किती राहणार तिकीट?

रेल्वेच्या सूत्रांनी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनने एससी चेअर कारमध्ये प्रवासासाठी सुमारे 1580 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 2870 रुपये तिकीट दर आकारले जाणार आहेत. 

हे पण वाचा :- मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट, प्रवाशांच्या अर्धा तासाचा वेळ वाचणार; प्रकल्पाचे काम केव्हा होणार पूर्ण ? MSRDC अधिकारी म्हणतात….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts