स्पेशल

मुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर ! 14 हजार कोटी रुपयाच्या मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर रेल्वे मंत्रालयाला सादर; कसा असणार रूटमॅप, थांबे कुठे? वाचा सविस्तर

Mumbai Hyderabad Bullet Train : मुंबई, पुणे सोलापूरकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ म्हणून ओळख प्राप्त असलेले सोलापूर लवकरच बुलेट ट्रेन ने जोडले जाणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन चा डीपीआर अर्थातच सर्वकश प्रकल्प अहवाल ज्याला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून ओळखलं जातं तो तयार करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हा डीपीआर रेल्वे मंत्रालयाकडे सादर झाला आहे.

हे पण वाचा :- खरं काय ! ‘हा’ 2 रुपयाचा स्टॉक 3 वर्षातच बनला 714 रुपयाचा, गुंतवणूकदारांना तीन वर्षातच मिळाला 25,407% परतावा, वाचा….

हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने हा डीपीआर तयार केला असून तो रेल्वे मंत्रालयाकडे आता सादर झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता पुढे रेल्वे मंत्रालय हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे सादर करणार. मग रेल्वे बोर्डाने याला मान्यता दिल्यानंतर या प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, आज आपण मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कसा आहे? याचा रूट मॅप कसा आहे? याला कुठे थांबे मिळतील? यासाठी किती खर्च अपेक्षित आहे? या संदर्भात अगदी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग : महामार्गालगत ‘या’ चार ठिकाणी तयार होणार हेलिपॅड, अपघात झाल्यास होणार मोठा फायदा

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

आम्ही आपणास सांगू इच्छितो की देशात हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून एकूण आठ मार्गावर बुलेट ट्रेन चालवल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देखील समावेश असून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

गुजरात आणि महाराष्ट्र जोडणारा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू यामुळे मुंबईवासियांना गुजरात मध्ये जाणे सोपे होणार आहे. यामुळे देशातील दोन महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. याव्यतिरिक्त मुंबई-नागपूर आणि मुंबई ते हैदराबाद दरम्यान देखील बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन बाबत बोलायचं झालं तर हा 711 किलोमीटर लांबीचा मार्ग राहणार आहे. 

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी; भारतीय वायुदलात ‘या’ पदाच्या 276 जागांसाठी होणार भरती, देशसेवेची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

बुलेट ट्रेन ताशी 250 ते 320km वेगाने धावणार आहे. अर्थातच वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा जवळपास दुप्पट वेग या गाडीला राहणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई ते हैदराबाद या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हे 711 किलोमीटरचे अंतर मात्र साडेतीन तासात पार होणार आहे. या मार्गावरील बुलेट ट्रेन साठी स्वातंत्र ट्रॅक तयार केले जाणार आहेत.

या प्रकल्पासाठी जवळपास 14 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनला पुणे, सोलापूर आणि पंढरपूर या मार्गावरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन दोन दिवस झाली रद्द, वाचा डिटेल्स

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts