Mumbai Job News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये ज्या लोकांना सरकारी नोकरी करायची असेल अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने या नव्या पदभरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन जाणकारांकडून करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत आज आपण मुंबई महापालिकेत निघालेल्या या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रिक्त पदांसाठी निघाली भरती?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत कार्यकारी अभियंता (परिवहन) पाणीपुरवठा मलनिस्सारण या कार्यालयाच्या आस्थापनेवरील वाहनचालक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
किती पदांसाठी निघालीय भरती
या पदभरती अंतर्गत ड्रायव्हर पदाच्या 56 जागा भरल्या जाणार असल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. मात्र या 56 जागांपैकी 16 जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित राहणार आहेत.
कोणाला करता येणार अर्ज, आवश्यक पात्रता?
या पदभरतीसाठी सर्वच उमेदवार पात्र राहणार नाहीत. या पदभरतीसाठी फक्त पालिकेतील कर्मचारीचं पात्र राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे पालिकेत कार्यरत असणाऱ्या समान वेतन श्रेणीच्या, मराठी लिहिता – वाचता येणाऱ्या कामगारांनाचं फक्त याकरीता अर्ज करता येणार आहेत.
मुंबई महापालिकेत या संबंधित कर्मचाऱ्यांनी तीन वर्ष सेवा पूर्ण केलेली असणे देखील आवश्यक राहणार आहे. तसेच उमेदवाराजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) जडवाहन चालवण्याचा किमान एक वर्षापूर्वीचा वैध परवाना असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उमेदवार हा वैद्यकीय दृष्ट्या फिट असावा.
अर्ज कुठे अन कधीपर्यंत करता येणार?
या पदभरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून 16 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज सादर केल्यास सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.