Mumbai Metro News : मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील मेट्रोचे जाळे सातत्याने विस्तारले जात आहे. मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मेट्रो सुरु करण्यात आली असून शहरातील विविध भाग मेट्रोने जोडले जात आहेत. दरम्यान येत्या काही महिन्यात मुंबईकरांना आणखी एका मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे.
शहरातील एका महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑरेंज मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे कल्याण ते तळोजा हा भाग मेट्रो ने जोडला जाणार असून यामुळे कल्याण ते तळोजा दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.
ऑरेंज मेट्रो लाईन प्रकल्प अंतर्गत कल्याण ते तळोजा दरम्यान मेट्रो मार्ग विकसित होत असून या मार्गामुळे कल्याण-डोबिंवली ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ऑरेंज मेट्रो लाइन १२ मुळे कल्याण-डोबिंवली महानगरपालिका क्षेत्र, कल्याणमधील ग्रामीण भाग हा नवी मुंबई, तळोजा भागांना जोडला जाणार आहे.
हा मेट्रो मार्ग उभारल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाणे ही शहरे नवीमुंबईसह पनवेल या शहरांना जोडली जातील. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू आहे.
प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून येत्या दोन वर्षात हा मेट्रो मार्ग पूर्ण होणार आहे.म्हणजेच 2027 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा मार्ग प्रत्यक्षात सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.
या मेट्रो मार्गावरील स्थानकांबाबत विचार करायचे झाल्यास या मार्गावर कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोबिंवली एमआयडीली, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा हे स्टेशन विकसित केली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी निलजे गावात डेपो तयार होणार आहे.
या प्रकल्पामुळे कल्याण ते तळोजा दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई शहरातील आणि उपनगरातील मेट्रोचे जाळे आणखी मजबूत होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाहतुकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होईल अशी आशा आहे. मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे.