Mumbai Mhada Lottery News : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे राजधानी मुंबई मध्ये घरांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता करून देणाऱ्या म्हाडाच्या घर सोडतीकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागून असते. दरम्यान मुंबई मंडळाच्या घर सोडतीला आता मुहूर्त लाभला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई मंडळाच्या घरोसोडतिची वाट पाहिली जात होती.
आता मात्र नागरिकांची ही प्रतीक्षा संपणार आहे. कारण की मुंबई मंडळ लवकरच लॉटरीची जाहिरात काढणार आहे. याबाबत मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मोठी माहिती दिली आहे. बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत गोरेगाव मधील म्हाडाच्या दोन मोठ्या प्रकल्पांना ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट मिळणार आहेत. तसेच या प्रकल्पांसाठी काही मोजक्या विभागाकडून आता परवानगी घेणे बाकी आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! अवकाळीच संकट अजून गेलेल नाही; ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस आणि गारपीट
यामुळे आता गोरेगाव सहित अन्य ठिकाणी बांधून तयार झालेल्या घरांसाठी लवकरच लॉटरीची जाहिरात काढली जाणार आहे. निश्चितच यामुळे नागरिकांची मुंबईमध्ये घर घेण्याची स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत. खरं पाहता शासनाने काही नवीन नियम तयार केले आहेत. या नियमानुसार सर्व विभागातील परवानगी घेतल्यानंतरच लॉटरी काढली जात आहे. जेणेकरून नागरिकांना लॉटरी लागल्याबरोबरच घरांचा ताबा देता येऊ शकतो.
हेच कारण आहे की वेगवेगळ्या विभागातील परवानगी घेण्यासाठी म्हाडाला अधिक वेळ लागत आहे. मात्र आता ओसी म्हणजे ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट प्राप्त झाले की लगेचच या घरांसाठी लॉटरीची जाहिरात निघणार आहे. एकंदरीत पुढील एक ते दोन महिन्यात म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी लॉटरी प्रसिद्ध होऊ शकते असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सुमारे चार हजार घरांचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे नागरिकांना मुंबईमध्ये 4000 घरे भविष्यात उपलब्ध होणार आहेत. यामध्ये गोरेगावच्या दोन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक 2,683 घरे बांधण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणे इत्यादी ठिकाणी घरे तयार झाली आहेत.
यामुळे लवकरच या तयार घरांसाठी लॉटरी निघणार आहे. खरं पाहता मुंबईमध्ये 2019 नंतर म्हाडाची घरांची लॉटरी निघालेली नाही, यामुळे नागरिक गेल्या अनेक महिन्यापासून घरांच्या लॉटरीची वाट पाहत असून आता येत्या 1-2 महिन्यात म्हाडाच्या माध्यमातून मुंबईमध्ये घरांची सोडत काढली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी मोठी भरती सुरु, अर्ज कुठं करणार, पहा…..