Mumbai Nagpur Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचे देशभरातील अनेक राज्यांमध्ये महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. देशात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित करण्यात आले आहेत. यामुळे शहरा शहरांमधील अंतर कमी झाले आहे. राज्यात अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत.
मुंबई आणि नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आत्तापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.
पुढे 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. अशा तऱ्हेने समृद्धी महामार्गाचा एकूण 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरु झाला असून उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे.
इगतपुरी ते ठाण्यातील आमने पर्यंतचा 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
येत्या महिन्याभरात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. समृद्धी महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर नागपूर ते मुंबई दरम्यान चा प्रवास जलद होणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गाने पूर्ण करता येणे शक्य होईल आणि यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचेल अशी आशा व्यक्त होत आहे.
खरंतर समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार होता.
मात्र शेवटच्या टप्प्यातील बहुतांशी कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत आणि यामुळे या टप्प्याचे लोकार्पण लांबले. पण आता येत्या महिन्याभरात हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार असून यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यान चा प्रवास जलद होणार आहे.