स्पेशल

मुंबई ते नागपूर प्रवास होणार गतिमान! ‘या’ तारखेपासून सुरू होणार Mumbai-Nagpur अतिरिक्त विमानसेवा, तिकीटही राहणार कमी, पहा….

Mumbai Nagpur New Flight Ticket Rate : मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी. नागपूर हे विदर्भाचे प्रवेशद्वार असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. म्हणून राजधानी मुंबईहून नागपूरला आणि नागपूरहून मुंबईला प्रवास करणाऱ्यांची संख्या ही विशेष उल्लेखनीय आहे.

यामध्ये हवाई मार्गे अर्थातच बाय एअर प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या या दोन कॅपिटल शहरांदरम्यान हवाई मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

आता मुंबई ते नागपूर अतिरिक्त विमान सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे या दोन शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास गतिमान होण्यास मदत होणार आहे.

हे पण वाचा :- दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महावितरण मध्ये ‘या’ पदासाठी मोठी भरती, अर्ज कसा करणार, वाचा

कोणती एअरलाइन्स सुरू करतेय विमान सेवा

एअर इंडिया ही एअरलाइन्स कंपनी या मार्गावर अतिरिक्त विमान सेवा सुरू करणार आहे. वास्तविक एअर इंडियाची ऑलरेडी या मार्गावर एक विमानसेवा सुरू आहे मात्र आताही अतिरिक्त विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय एअर इंडिया एअरलाइन्स ने घेतला आहे. 

हे पण वाचा :- शेअर आहे का कुबेरचा खजाना ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिला 3,050 टक्क्याचा परतावा, 1 लाखाचे बनलेत किती?, पहा….

केव्हा सुरु होणार विमानसेवा

एअर इंडिया कंपनीच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार ही अतिरिक्त विमान सेवा 20 मे 2023 रोजी सुरू होणार आहे. ही विमान सेवा नियमित राहणार नसून एका ठराविक कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे.

20 मे ते 28 ऑक्टोबर पर्यंत ही अतिरिक्त विमान सेवा सुरू राहणार आहे. मात्र, नंतर एअर इंडियाच्या माध्यमातून ही विमान सेवा नियमित केली जाऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांची बल्ले बल्ले! 8 दिवस अगोदरच मान्सूनच आगमन; ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार Monsoon, पंजाब डख यांचा अंदाज

कसं राहणार अतिरिक्त विमानसेवेच वेळापत्रक

20 मे ते 28 ऑक्टोबर दरम्यान धावणाऱ्या या विमानसेवेच वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- हे विमान रोज मुंबईहून 11 वाजता नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. तसेच नागपूरहून बारा वाजून पाच मिनिटांनी हे विमान मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.

नागपूर ते मुंबईचा हा प्रवास एका तासात हे विमान करण्यास सक्षम राहील. दरम्यान या विमानसेवेमुळे इतर एअरलाइन्स कंपन्यांचे तिकीट दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट, तर ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts