Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन कॅपिटल शहरांना परस्परांना थेट रस्तेमार्गे जोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई नागपूर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारण्यात येत आहे. या एक्सप्रेसवे ला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे.
या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी, 520 किलोमीटर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला होता.
विशेष बाब म्हणजे आज अर्थातच 26 मे 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते भरवीर, 80 किलोमीटर प्रवाशांसाठी खुला होणार आहे.
हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांची झाली चांदी ! ‘या’ राज्य शासनाने चक्क 8% महागाई भत्ता वाढवला, शासन निर्णयही निघाला, वाचा सविस्तर
त्यामुळे आता नागपूर ते भरविरचा प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे. यामुळे नासिक वासियांचा शिर्डीकडील प्रवास देखील गतिमान होण्यास मदत होणार आहे. अशातच समृद्धी महामार्ग संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गा लगत आता चार हेलिपॅड तयार केले जाणार आहेत.
जीवघेण्या अपघातांसह संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी, हे हेलिपॅड उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. दरम्यान आज आपण समृद्धी महामार्गालगत कोणत्या ठिकाणी हे चार हेलिपॅड उभारले जातील या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- आजोबांच्या किंवा वडिलांच्या नावे असलेल्या संपत्तीवर, मालमत्तेवर लोन घेता येते का? काय सांगतो नियम, वाचा….
कुठं तयार होणार हेलिपॅड
हाती आलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गालगत पहिला हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान बोगद्याच्या विभागाजवळ उभारला जाईल. सध्या या भागाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच या महामार्गालगत शिर्डी येथे दुसरे हेलिपॅड तयार होणार आहे आणि तिसरे हेलिपॅड औरंगाबाद येथे विकसित करण्याची योजना राज्य रस्ते विकास महामंडळाची आहे.
चौथ्या हेलिपॅडसाठी मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप जागा निश्चित केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद ते नागपूर दरम्यानच्या मार्गात हे हेलिपॅड तयार होणार असल्याचे सांगितले गेले आहे.
हे चौथे हेलीपॅड विदर्भातच तयार होईल असे मानले जात आहे. या महामार्गालगत तयार होणाऱ्या हेलिपॅडवर अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावेत यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- खरं काय ! ‘हा’ 2 रुपयाचा स्टॉक 3 वर्षातच बनला 714 रुपयाचा, गुंतवणूकदारांना तीन वर्षातच मिळाला 25,407% परतावा, वाचा….