Mumbai New Expressway : मुंबईसह महाराष्ट्रासाठी आत्ताच्या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते बेंगळूरू दरम्यान 14 पदरी महामार्ग तयार होणार अशी घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या महामार्ग प्रकल्पाचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे मुंबईला जोडणाऱ्या आणखी एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाच्या कामासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई ते बडोदा महामार्ग प्रकल्पाचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे महाराष्ट्रातील काम पूर्ण झाले असून यामुळे बदलापूर आणि नवी मुंबई शहराला कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.
हा महामार्ग नवी मुंबईतील जेएनपीटी बंदराला जोडला जाणार आहे. यामुळे कृषी अन औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. हा महामार्ग प्रकल्प मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई गोवा महामार्गाला देखील जोडला जाणार आहे.
या महामार्गांना मुंबई बडोदा महामार्ग जुलै 2025 पर्यंत जोडला जाणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे पनवेल ते बदलापूर हा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
कोणते काम पूर्ण झालं ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रकल्पांतर्गत विकसित होत असणाऱ्या सासूपाडा ते घोडबंदर या चार पदरी पुलाचं काम ९८ टक्के पूर्ण झालं आहे. तसेच, गंजाड ते तलासरी या टप्प्याचं काम ९० टक्के, अच्छाद ते दहीसरदरम्यानच्या टप्प्याचं काम ४१ टक्के पूर्ण झालं आहे.
हे सर्व काम या वर्षातील नोव्हेंबर महिन्यात या पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महामार्ग प्रकल्पांतर्गत दोन दुहेरी बोगदे तयार केले जाणार आहेत. यातील एका बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे काम 80% पर्यंत पूर्ण झाले आहे.
या दुसऱ्या बोगद्याचे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. एकंदरीत हा महामार्ग प्रकल्प येत्या काही महिन्यात पूर्णपणे बांधून तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे.