Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईकरांना भविष्यात नरिमन पॉईंट ते विरार हा प्रवास फक्त 35 मिनिटात करता येणे शक्य होणार आहे. सध्या स्थितीला नरिमन पॉईंट ते विरार असा प्रवास करायचा झाल्यास मुंबईकरांना तब्बल अडीच तासांचा वेळ लागतोय.
मात्र भविष्यात हा प्रवास अवघ्या पस्तीस ते चाळीस मिनिटात करता येणे शक्य होईल असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. यासाठी एका नव्या मार्गाची उभारणी केली जाणार आहे. राजधानीत आता एक नवा मार्ग तयार होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार मुंबईतील कोस्टल रोडचा विस्तार केला जाणार आहे.
मुंबईचा कोस्टल रोड आता पालघर जिल्ह्यातील विरार पर्यंत विस्तारित होणार आहे. म्हणून जेव्हा नरिमन पॉईंट ते विरार पर्यंत कोस्टल रोडचा विस्तार होईल तेव्हा हा दोन अडीच तासांचा प्रवास फक्त 35 ते 40 मिनिटात पूर्ण होईल असा दावा आता होऊ लागला आहे.
फडणवीसांनी सांगितलं की, जपान सरकार कोस्टल रोड पुढे विरारपर्यंत वाढवण्यासाठी ५४००० कोटी रुपये देणार आहे. तर दुसरीकडे वर्सोवा ते मढ लिंकपर्यंतचं टेंडर आधीच जारी करण्यात आलं आहे. मढ ते उत्तान लिंकपर्यंतचं काम आता सुरू होणार असल्याची माहिती सुद्धा माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुंबईमधील पश्चिम किनाऱ्यावरील कोस्टल रोड हा ८ लेनचा म्हणजे आठ पदरी राहणार आहे. तो २९.२ किमी लांबीचा मार्ग आहे. हा एक्सप्रेस-वे दक्षिणेकडील मरीन लाइन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना एकत्र जोडणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोस्टल रोड चा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे नुकत्याच काही महिन्यांपूर्वी म्हणजेच मार्च 2024 मध्ये उद्घाटन झाले आहे. प्रिंसेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते बांद्रा – वरळी सी लिंकपर्यंतच्या १०.५८ किमीच्या मार्गाचे उद्घाटन पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू आहे.
वरळी आणि दक्षिण मुंबईमधील मरिन ड्राईव्हदरम्यानच्या कोस्टल रोडचे वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या मार्गासाठी 12 हजार 721 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. दरम्यान आता हाच कोस्टल रोड पालघर जिल्ह्यातील विरार पर्यंत जाणार आहे.
यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. मुंबईमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईमधील कनेक्टिव्हिटी वाढेल आणि मुंबईकरांचा प्रवास जलद होईल असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.