Mumbai News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात रस्त्यांची कामे केली जात आहेत. तसेच मुंबईमध्येही BMC च्या माध्यमातून वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत.
बीएमसीच्या माध्यमातून मुंबईला उपनगरांशी जोडण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईला कल्याण, भिवंडी, मीरा-भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई, ठाणे या उपनगरांशी जोडण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च करून बीएमसीच्या माध्यमातून रस्ते विकासाची कामे केली जात आहेत.
याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कोस्टल रोड या प्रकल्पाचा देखील समावेश करण्यात आला आहे. दरम्यान आता बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या या बहुचर्चित अशा प्रकल्पबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. खरं पाहता, या कोस्टल रोड चा आता विस्तार होणार असून वर्सोवा ते दहिसर पर्यंत हा प्रकल्प वाढवला जाणार आहे. याची घोषणा महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यासाठी 9000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. सध्या स्थितीला वर्सोवा ते दहिसर हे अंतर पार करण्यासाठी एक तासांचा कालावधी प्रवाशांना लागतो. वास्तविक पाहतां हे अंतर 22 किलोमीटरचं आहे. मात्र वाहनांची संख्या पाहता हे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना अधिक वेळ लागत आहे. मात्र या नव्याने विकसित होणाऱ्या कोस्टल रोडच्या माध्यमातून हे अंतर मात्र 15 मिनिटात पार करता येणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान या कोस्टल रोड साठी मार्च एप्रिल मध्ये निविदा काढल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे याचे प्रत्यक्ष काम हे 2023 24 दरम्यान सुरू होईल असं सांगितलं जात आहे. याशिवाय दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यान देखील एक रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता जवळपास सहा किलोमीटर लांबीचा असून यासाठी गेल्यावर्षी निविदा निघाली आहे.
विशेष बाब अशी की या प्रोजेक्टमध्ये दीड किलोमीटर लांबीची हद्द ही बीएमसीच्या अखत्यारीत आहे तर उर्वरित हद्द ही मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत आहे. विशेष म्हणजे हा रस्ता भविष्यात कोस्टल रोडच्या शेवटच्या टोकाला जे की कांदिवली येथे राहणार आहे त्याला जोडला जाणार आहे. यामुळे दक्षिण मुंबई ते मिरा-भाईंदर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे.
कोस्टल रोड साठी मात्र निधीची कमतरता
जसं की आपणास ठाऊकच आहे बीएमसीच्या माध्यमातून 2023 24 साठी बजेट सादर झाला आहे. या बजेटमध्ये कोस्टल रोड चा प्रामुख्याने विचार झाला आहे. या कोस्टल रोड साठी 3545 कोटी रुपयांची निधी बीएमसी ने तरतूद केली आहे. परंतु सध्या स्थितीलाच बीएमसीच्या माध्यमातून तयार केल्या जाणाऱ्या या कोस्टल रोड साठी 5000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची आवश्यकता आहे.
यामुळे बीएमसी या उर्वरित निधीची कशा पद्धतीने उभारणी करते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान, संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम हे पूर्ण होणार आहे. जवळपास दहा किलोमीटर लांबीचा हा रस्ता राहणार आहे. दरम्यान हा रस्ता वरळीमध्ये वरळी वांद्रे सी लिंक ला जोडला जाणार आहे. सीलिंकवरील प्रिन्सेस स्ट्रीटला हा रस्ता जोडला जाईल असं सांगितलं जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गतवर्षी कोस्टल रोडसाठी यंदा मंजूर झालेल्या निधीपेक्षा कमी निधीची तरतूद झाली होती. 2650 कोटी रुपयांची तरतूदचं गेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र यंदा 3545 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. म्हणजे 900 कोटी रुपये अधिक देण्यात आले आहेत. खरं पाहता, बीएमसीच्या माध्यमातून विकसित केल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी अंदाजे 12,700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
निश्चितच या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता बीएमसीला भासणार आहे. दरम्यान, कोस्टल रोडच्या कामाबाबत जर विचार केला तर आतापर्यंत 69% काम पूर्ण झाले आहे. सध्या कोस्टल रोडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचे काम वेगात सुरू असून लवकरात लवकर हे काम पूर्णत्वाकडे नेण्याचा अट्टाहास केला जात आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत बोगदे देखील विकसित केलें जात आहेत. यात दुसऱ्या बोगद्याचे काम हे 90% पूर्ण झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोस्टल रोडच्या अशा राहणार विशेषता
हजारो करोडचा खर्च करून विकसित केल्या जाणारे या पोस्टल रोडच्या विशेषता देखील मोठ्या उल्लेखणीय राहणार आहेत. खरं पाहता कोस्टल रोडवर प्रवाशांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. कोस्टल रोडवर प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही, व्हिडीओ मॅनेजिंग सिस्टीम, इमर्जन्सी कॉलिंग सुविधा, पोलीस आणि अग्निशमन दलाशी त्वरित संपर्क केला जाईल अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. निश्चितच कोस्टल रोडवर सुरक्षित प्रवास हा प्रवाशांना करता येणार आहे.
त्शिवाय प्रवाशांना काही सुविधा देखील कोस्टल रोड लगत मिळणार आहेत. यामध्ये सुमारे 75 लाख चौरस फूट जागेत गार्डन, जॉगिंग ट्रॅक, ओपन थिएटर, 3 भूमिगत पार्किंग, शौचालये विकसित केले जाणार असून यामुळे प्रवाशांना प्रवास करताना कोणतीच अडचण भासणार नसल्याचा दावा बीएमसीच्या माध्यमातून केला जात आहे.
या कोस्टल रोड लगत जी तीन भूमिगत पार्किंग उभारली जाणार आहेत त्याबाबत अधिक माहिती अशी की, या भूमिगत वाहन पार्किंग मध्ये 1856 वाहने पार्क करण्यासाठी व्यवस्था राहणार आहेत. विशेष म्हणजे वाहन पार्किंग भूमिगत करण्याचे कारण असे की या वाहन पार्किंगच्यावर गार्डन आणि खेळण्यासाठी क्रीडांगण विकसित करण्याचा मानस प्राधिकरणाचा आहे. निश्चितच हा संपूर्ण कोस्टल रोड हायटेक राहणार असून यामुळे मुंबईच मुंबई उपनगरासोबत कनेक्ट वाढण्यास मदत होणार आहे.