Mumbai News : मुंबई व उपनगरात लोकल ही दळणवळण व्यवस्थेची सर्वात महत्त्वाची कडी आहे. विशेष म्हणजे लोकलला बळकटी देण्यासाठी देखील कायमच प्रयत्न केले जातात. लोकलचा विस्तार करण्यासाठीही रेल्वे विभागाकडून नेहमीच प्रयत्न करण्यात आले आहेत. दरम्यान आता सीएस एम टी ते उरण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
खरं पाहता गेल्या अनेक वर्षांपासून नेरूळ बेलापूर उरण मार्ग पूर्ण होण्याची वाट पाहिली जात आहे. या मार्गीकेचा पहिला टप्पा हा 2018 मध्येच पूर्ण झाला आहे. पण या मार्किकेचा दुसरा टप्पा अजून पूर्ण होणे बाकी आहे. नेरूळ-बेलापूर ते खारकोपर हा रेल्वे मार्ग ऑलरेडी प्रवाशांच्या सेवेत असून आता दुसरा टप्पा अर्थातच खारकोपर ते उरण केव्हा सुरू होतो याकडे प्रवाशांचे लक्ष आहे.
याबाबत आता एक मोठी अपडेट देखील हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा दुसरा टप्पा या चालू महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. म्हणजेच आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उरणदरम्यानचा प्रवास लोकलने शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार असून याचा सर्वाधिक फायदा उरण कडील लोकांना होणार आहे. या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे सर्वेक्षण चार ते सहा मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या माध्यमातून होणार आहे.
यानंतर या मार्गे केला सर्वसामान्यांसाठी खुली केली जाणार आहे. सध्या स्थितीला मुंबईकर नेरूळ-बेलापूर ते खारकोपर यादरम्यानचा प्रवास लोकलने करत आहेत. मात्र आता हा दुसरा टप्पा झाल्यानंतर मुंबईकर थेट उरण पर्यंतचा प्रवास लोकलने करू शकणार आहेत. याबाबत मध्ये रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार खारकोपर ते उरण ही मार्गी का या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुली होणार आहे.
या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प 26.7 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी नेरूळ बेलापूर ते खारकोपर पर्यंतच काम हे पूर्ण झाला आहे. हे अंतर जवळपास 12.4 किलोमीटरचे आहे. आता उर्वरित 14.3 किलोमीटरचे खारकोपर ते उरण पर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले असून या चालू महिन्यात हे देखील काम पूर्ण होईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
या रेल्वे मार्गावरील स्थानकाचा विचार केला असता नेरूळ, सीवूड-दारावे, सागरसंगम, तारघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावाशेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी आणि उरण या एकूण अकरा रेल्वेस्थानकांचा यात सामावेश आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 1782 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निश्चितच आता या प्रकल्पाचा दुसरा फेस किंवा टप्पा या महिन्याअखेर सुरू होणार असल्याने सर्वसामान्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.