Mumbai News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळे रस्ते मार्ग, लोहमार्ग, सागरी पूल, यासारखी कामे जोमात सुरु आहेत. अशातच वेगवेगळे विकास कामांचे लोकार्पण देखील सुरू आहे. रस्ते विकास आणि लोहमार्गाबरोबरच आता जलमार्ग देखील विकसित होत आहेत. दरम्यान आता राजधानी मुंबईतुन आनंदाची बातमी समोर येत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे.
यामुळे बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया हा प्रवास सोयीचा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया रस्ते मार्गाने जर प्रवास करायचं झालं तर प्रवाशांना चाळीस किलोमीटरचे अंतर पार कराव लागतं. विशेष म्हणजे या दोन ठिकाणादरम्यान रस्ते मार्गाने प्रवासासाठी दीड तासांचा कालावधी लागतो.
मात्र आता गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे आता तासाचा हा प्रवास मात्र 55 मिनिटात पूर्ण होणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा जवळपास 35 मिनिटांचा कालावधी वाचणार आहे. जलमार्गे गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर हे अंतर मात्र 24 किलोमीटरच राहणार आहे.
निश्चितच यामुळे प्रवाशांची सोय या ठिकाणी होणार असल्याचा दावा केला जातो. मात्र या प्रवासासाठी 250 रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. बिझनेस क्लास मध्ये हा दर 350 रुपये एवढा राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वॉटर टॅक्सीची सुरुवात बंदरे विकास मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
कसं राहणार वॉटर टॅक्सी चे वेळापत्रक
ही वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान धावणार असून 200 प्रवाशी क्षमता या वॉटर टॅक्सीचीं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वॉटर टॅक्सी सकाळी साडेआठ वाजता बेलापूर येथून गेटवे ऑफ इंडिया दरम्यान धावणार आहे. तसेच ही वॉटर टॅक्सी सायंकाळी साडेसहा वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून बेलापूर दरम्यान धावणार आहे. म्हणजेच दिवसाला दोन फेऱ्या या टॅक्सीच्या होणार आहेत.
या वॉटर टॅक्सीची विशेष बाब अशी की यादरम्यान प्रवास करण्यासाठी ऑनलाईन बुकिंग प्रवाशांना करता येणार आहे. यासाठी माय बोट राईड या संकेतस्थळावर प्रवाशांना बुकिंग मात्र करावी लागणार आहे. निश्चितच ही वॉटर टॅक्सी बेलापुर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.