Mumbai-Pune Electric Shivneri Bus : एक मे 2023 रोजी अर्थातच महाराष्ट्र दिनी शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून राज्यातील जनतेला एक खास गिफ्ट देण्यात आले. शिंदे सरकारने या दिवशी इलेक्ट्रिक शिवनेरीची सुरुवात केली.
एक मे ला एसटी महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक शिवनेरी बस दाखल झाली. सर्वप्रथम एसटी महामंडळाच्या माध्यमातून ठाणे ते पुणे या मार्गावर इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुरू करण्यात आली.
सध्या ठाणे ते पुणे या मार्गावर 14 इलेक्ट्रिक शिवनेरी बस धावत असून यांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. दरम्यान आता दादर ते पुणे या मार्गावर देखील इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुरू होणार आहेत.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बंद झालेली एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरू, केव्हा धावणार? पहा….
यामुळे निश्चितच या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर 15 इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुरू करण्यात आल्या असून भविष्यात आणखी पंधरा बसेस या मार्गावर सुरू होणार आहेत. निश्चितच एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे दादर ते पुणे हा प्रवास सुपरफास्ट होण्यास मदत होणार आहे.
किती राहणार तिकीट दर?
या मार्गावरील इलेक्ट्रिक शिवनेरी बसचे तिकीट दर जाहीर करण्यात आले आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक शिवनेरी बस मे प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 515 रुपये तिकीट काढावे लागणार आहे. तसेच 275 रुपयाचे अर्धे तिकीट राहणार आहे. म्हणजेच महिलांना आता 275 रुपयातच इलेक्ट्रिक शिवनेरी बसने या मार्गावर प्रवास करता येणार आहे.
कसं राहणार वेळापत्रक?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या मार्गावर एसटी महामंडळाच्या माध्यमातून 30 इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुरू केल्या जाणार आहेत. सध्या 15 इलेक्ट्रिक शिवनेरी बस एसटी महामंडळाने या मार्गावर सुरू केल्या आहेत आणि आगामी काही दिवसात आणखी पंधरा इलेक्ट्रिक शिवनेरी बस या मार्गावर धावणार आहेत.
विशेष बाब म्हणजे दर पंधरा मिनिटांनी या मार्गावर इलेक्ट्रिक शिवनेरी बस धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दादरहून पहीली इलेक्ट्रिक शिवनेरी बस सकाळी सव्वा पाच वाजता सुटणार आहे. त्यानंतर मग दर पंधरा मिनिटांनी बस सुटणार आहे. शेवटची बस ही सायंकाळी साडेसहा वाजता सोडली जाणार आहे.